Saturday, October 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘सा रे ग म प’मध्ये सोनिया गाझमेरला मिळाले आपले पहिले स्वतंत्र गाणे; गाणे ऐकून अभिनेत्री सान्या मल्होत्रा झाली थक्क!

‘सा रे ग म प’च्या येत्या वीकेण्डच्या भागात हिमेश रेशमिया, नीति मोहन आणि अनु मलिक हे परीक्षक असून आदित्य नारायण हा सूत्रसंचालन करील. यांच्याशिवाय या उपान्त्य फेरीत ‘सॅम बहादुर’ चित्रपटातील विकी कौशल, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा हे प्रमुख कलाकारही विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. परीक्षक आणि विशेष अतिथींवर प्रभाव टाकून अंतिम स्पर्धेत जाण्यासाठी कार्यक्रमातील टॉप 5 स्पर्धक हे आपल्या परीने सर्वोत्कृष्ट गायन सादर करणार असल्याने हा भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरेल. इतकेच नव्हे, तर या पाचही स्पर्धकांच्या काही चाहत्यांना या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी फर्माईश केलेली गाणी हे स्पर्धक गातील.
या स्पर्धकांपैकी सोनिया गाझमेरसाठी हा भाग अभिमानास्पद ठरला कारण तिला तिचे ‘गुस्ताख आँखे’ हे पहिले स्वतंत्र गाणे ध्वनिमुद्रित करण्याची संधी मिळाली. विवेक कर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तिच्या या पहिल्या गाण्याला विकी कौशल, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या कलाकारांनी पहिला क्लॅप दिल्याने सोनियाचा आनंद गगनात मावेना. त्यानंतर तिने सादर केलेल्या या गाण्याची परीक्षक आणि विशेष अतिथींकडून जोरदार प्रशंसा करण्यात आली. पण तिचे गाणे ऐकून सान्या मल्होत्रा फारच भारावून गेली होती. आपण एका स्टुडिओतील सेटवर नव्हे, तर गाण्याच्या
एका जलशात आहोत की काय, असेच आपल्याला वाटत होते, असे सान्या म्हणाली. सोनिया यापुढे जेव्हा केव्हा गाण्याच्या जाहीर सकार्यक्रमात गाणे गाईल, तेव्हा आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू, असे आश्वासन देऊन सान्या म्हणाली की आपण तिच्या कार्यक्रमाचे तिकिट विकत घेऊन तिथे उपस्थित राहू.
सान्या मल्होत्रा म्हणाली, “सोनियाचं गाणं ऐकताना मी एका संगीत जलशातच आहे, असं मला वाटत होतं. यापुढे जेव्हा सोनिया जाहीर कार्यक्रमात गाणार असेल, तेव्हा मी त्या कार्यक्रमाचं तिकिट काढून तिथे उपस्थित राहीन. तिथे आपण दोघी तुझ्या गाण्यावर ताल धरू!”
सोनियाच्या सुरेल गायनाने सर्वांवर मोहिनी घातली असली, तरी ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाच्या भव्य अंतिम फेरीसाठी सिध्द व्हा. ‘सा रे ग म प’च्या या आवृत्तीची सांगता होत असली, तरी तुम्हाला तुमच्या आवडत्या स्पर्धकासाठी मतदान करायचे असेल, तर अल्बर्टसाठी 8291829113 या क्रमांकावर, निष्ठासाठी 8291829114 या क्रमांकावर, स्नेहासाठी 8291829115 या क्रमांकावर, रनितासाठी 8291829116 या क्रमांकावर आणि सोनियासाठी 8291829117 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. किंवा Zee5 वर लॉगिन करा. येत्या रविवारी रात्री 9 वाजता पाहा ‘सा रे ग म प’ स्पर्धेची अंतिम फेरी फक्त ‘झी टीव्ही’वर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading