संयुक्त उपचार पद्धती ही काळाची गरज – डॉ. राज लवंगे
पुणे : आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे. तसेच संयुक्त उपचार पद्धती हि सध्या काळाची गरज आहे. यामध्ये आणखी संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत पुणे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राज लवंगे यांनी व्यक्त केले.
सहकारनगर येथील विश्वानंद केंद्रामध्ये आठवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व श्री धन्वंतरी जयंती सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सर्वांच्या आरोग्य रक्षणासाठी धन्वंतरी यागाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वानंद केंद्राचे विश्वस्त आनंद चोरडिया आणि गौरी चोरडिया यांच्या हस्ते धन्वंतरी याग संपन्न झाला. यावेळी पुणे डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. डी. बी. शिंदे, सेक्रेटरी डॉ. दिपाली वाघ उपस्थित होते. केंद्राचे संस्थापक राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.
यावेळी मधुबाला चोरडिया, विश्वानंद केंद्रातील सर्व वैद्य, सर्व कर्मचारी आणि उपचार घेऊन बरे झालेले लाभार्थी आवर्जून उपस्थित होते. मंदार खळदकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली महापूजा व भक्तिगीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय संचालक डॉ. अजितकुमार मंडलेचा यांनी केले आणि आभार प्रदर्शन व्यवस्थापक डॉ. भूषण केदारी यांनी केले.