fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

भारतीय बाजारपेठेवर ‘अपस्टॉक्स’ची मोठी भिस्त; गुंतवणुकीच्या सवयी बदलण्याचे उद्दिष्ट

पुणे :  भारतातील आघाडीच्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मपैकी एक असणाऱ्या अपस्टॉक्स‘ या (आरकेएसव्ही सिक्युरिटीज इंडिया प्रा. लि. या नावानेही ओळखले जाणाऱ्या) प्लॅटफॉर्मने आज आपल्या अॅपवर काही सुधारित वैशिष्ट्ये सादर केली आहेत. या वैशिष्ट्यांच्या आधारे भारतीय गुंतवणूकदारांना अधिक सुलभतेने गुंतवणूक करता येणार आहे. गुंतवणूकदारांचे आतापर्यंतचे विविध अनुभव लक्षात घेऊन अपस्टॉक्सने ही गुंतवणुकीची प्रक्रिया अखंडमाहितीपूर्ण आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक व्यक्तींना गुंतवणूक करण्याची इच्छा तर असते; तथापि बरेच पर्याय समोर असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. तो उडू नयेया दृष्टीने ही नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

भारत विकासाच्या दिशेने घोडदौड करीत आहे आणि यामध्ये इक्विटी क्षेत्राचे मोठे योगदान आहेयावर अढळ विश्वास असलेल्या अपस्टॉक्सनेभारतात गुंतवणूक कशी वाढविता येईलयावर लक्ष केंद्रित केले आहे. बाजाराच्या कामगिरीचा मागोवा घेण्याचा एक मार्ग असलेल्या इंडेक्स फंडांची ओळख करून देऊन अपस्टॉक्सने महागाईवर मात करण्याचा व संपत्ती वाढविण्याचा एक किफायतशीरसुलभ आणि दीर्घकालीन उपाय पूर्वीच उपलब्ध करून दिला आहे.

गुंतवणुकीची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी, ‘अपस्टॉक्सने शेकडो म्युच्युअल फंड योजनांचे जोखीम-बक्षीस या गुणोत्तरावर आधारित मूल्यांकन करण्याचे मोठे कार्य हाती घेतले आहे आणि त्यातून प्रत्येक श्रेणीतील काही शीर्ष योजना तयार केल्या आहेत. फंडांची ही काळजीपूर्वक बनवलेली यादी आणि तज्ज्ञांचे विश्लेषण यांतून वापरकर्त्यांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी अॅपमधील सर्वोत्तम अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न हा ब्रँड करतो. यामध्ये माहिती आणि संशोधन या गोष्टीही गुंतवणूकदारांना पुरविल्या जातात. त्यामुळे गुंतवणूकदार चांगल्या प्रकारे निर्णय घेण्यास सक्षम होतात.

अपस्टॉक्सकडे १ कोटींहून अधिक ग्राहक आहेत आणि या पोर्टफोलिओमध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास २० टक्के आहे. केवळ या राज्याचाच विचार केल्यास, अपस्टॉक्सचा अॅप वापरण्याच्या बाबतीत मुंबईपुणेठाणेनाशिक आणि नागपूर येथील नागरीक आघाडीवर आहेत. अपस्टॉक्सच्या विविध ग्राहकवर्गामध्ये व्यावसायिकसरकारी कर्मचारी आणि गृहिणी यांचा समावेश आहे. अपस्टॉक्सचे महाराष्ट्रातील सुमारे ७५ टक्के ग्राहक १८ ते ३५ वयोगटातील आहेत.

अपस्टॉक्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “आर्थिक गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. वैविध्यपूर्ण आर्थिक गुंतवणुकीची संस्कृती उभी करण्याचे आमचे मूळ धोरण आहे. ते आम्‍हाला नवीन क्षितिजे गाठण्‍यास मदत करेल आणि आम्हाला ग्राहकांच्‍या पसंतीचा भागीदार बनवेलयाबद्दल आम्‍ही आशावादी आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच समजून घेतो. त्यांना चांगले अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशभरात गुंतवणूक वाढावीअशी आमची इच्छा आहे.”

गुंतवणूक ही प्रक्रिया सोपीपरवडणारी आणि सहज करण्याजोगी असावीअसे अपस्टॉक्सचे धोरण आहे. तसेच ग्राहकांच्या गुंतवणुकीच्या पद्धतींत बदल घडवून आणणेया पद्धती माहितीपूर्ण व त्रासमुक्त करणे हेही अपस्टॉक्सचे उद्दिष्ट आहे.

अपस्टॉक्सकडे वैविध्यपूर्ण असा ग्राहकवर्ग आहे. कंपनीने त्यांच्यासाठी वापरण्यास सोपापारदर्शक आणि परवडणारा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून संपूर्ण भारतामध्ये गुंतवणूक संस्कृती वाढवण्याचे प्रयत्न चालविले आहेत. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत प्रायोजक या नात्याने अपस्टॉक्सने इन्व्हेस्ट राइट‘ नावाची व्यापक मोहीम सुरू केली आहे. लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणे हा त्यामागे उद्देश आहे. या उपक्रमात अपस्टॉक्सने “खाता खोला क्या?” ही जाहिरातही सोशल मीडियावर सादर केली. विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीत लोकांनी आपला गुंतवणूकीचा प्रवास सुरू करावायाकरीता या जाहिरातीतून आवाहन करण्यात आले. अनेकदा असे दिसून येतेकी लोक गुंतवणूक करू इच्छितातपरंतु त्यातील अनेकविध पर्याय पाहून ते बिचकतात. म्हणूनच अधिकाधिक भारतीयांना गुंतवणुकीचे माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रेरित करणे हा यामागचा अपस्टॉक्सचा उद्देश आहे.

या वैशिष्ट्यासोबतचगुंतवणुकीच्या साध्या-सोप्या पद्धतींबद्दलत्यांतून मिळणाऱ्या लाभांबद्दल लोकांना शिक्षित करण्याचेदेखील अपस्टॉक्सचे ध्येय आहे. उदाहरणार्थएखाद्याने फक्त ५ हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि त्यातून १२.५ टक्के परतावा मिळत असेल, तर २५ वर्षे ही गुंतवणूक करून तो एक कोटी रुपयांपर्यंतची जमापुंजी मिळवू शकतो. यामध्ये चक्रवाढीची शक्ती महत्त्वाची ठरते. अशीच इतरही लाभाची काही उदाहरणे अपस्टॉक्सतर्फे मांडण्यात आली आहेत. ती अनुसरण्यास अतिशय सोपी आहेत.

या प्रत्येक उदाहरणातून लोकांनी गुंतवणुकीमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणती पावले उचलावीतते दाखविण्यात येते. या संपूर्ण मोहिमेदरम्यान म्युच्युअल फंडतांत्रिक विश्लेषणऑप्शन ट्रेडिंग आणि इतर काही मुद्द्यांवर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शैक्षणिक सत्रांची मालिकाही अपस्टॉक्स आयोजित करीत आहे. लोकांना गुंतवणुकीसाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करणेत्यांना शिकण्यासनिर्णय घेण्यासगुंतवणूक व ट्रेडिंग करण्यास सक्षम करणेहे अपस्टॉक्सचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

%d