Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षण आंदोलना विरोधात हायकोर्टात याचिका दाखल; आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी

मुंबई :  अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात गेले आहेत. राज्यभर आक्रमक होत असलेल्या मराठा आंदोलकां विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अॅड. सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात केली आहे. येत्या 8 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मागील आठ दिवसांपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. या दरम्यान इतके दिवस शांततेत चाललेलं आंदोलन भडकलं अन् राज्यभर मराठा आंदोलकांनी तोडफोड, जाळपोळ सुरू केली. यातच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची देखील तोडफोड मराठा आंदोलकांनी केली. या पार्श्वभूमीवर अॅड. गुणरत्न सदावर्ते  यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, यापूर्वीही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणा विरोधात न्यायालयीन लढा दिला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading