Monday, August 31, 2026
Latest NewsSportsTOP NEWS

ODI World cup 2023 : सचिनच्या ‘होमटाऊन’मध्ये किंग कोहलीचा विक्रम हुलका

मुंबई : सचिनच्या ‘होमटाऊन’मध्ये अर्थात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वनडेतील 49 वे शतक झळकवून विराट कोहली सचिनच्या विक्रमाची बरोबरी करेल, अशी अपेक्षा आज सर्वच क्रिकेटप्रेमी करत होते. मात्र, यासगळ्यांची सपशेल निराशा झाली. कारण विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकाने हुलकावनी दिली. शतकाला अवघ्या 12 धावा कमी असताना श्रीलंकेच्या मधुशंकाच्या बॉलवर विराट कोहली आऊट झाला.

ODI World cup 2023 मधील आजच्या भारत विरूद्ध श्रीलंका सामान्याट किंग विराट कोहली आणि प्रिन्स शुभमन गिल या दोघांचीही शतके हुकली. श्रीलंकेच्या मधुशंकाने दोघांनाही तंबूत पाठवले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामान्यात शुभमन गिल 92 तर विराट कोहली 88 धावांवर बाद झाला. सुरवातीला कॉप्टन रोहित शर्मा केवळ चार धावांवर बाद झाल्या नंतर विराट आणि गिल यांनी भारता डाव सावरला. दरम्यानच्या खेळात दोघांनाही मिळालेल्या जिवादानाचा पुरेपूर फायदा घेत सामान्याट दोघांनी 189 धावांची भागीदारीही केली. विराट कोहलीने 94 चेंडूत 88 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने 11 चौकार लगावले.

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading