Monday, August 31, 2026
BusinessLatest News

प्रवाशांकरिता एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक आणि इक्सिगो (ixigo) द्वारे एकत्रितपणे प्रिमियम ट्रॅव्हल क्रेडिट कार्डबद्दलची घोषणा

नवी दिली : एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक (AU SFB), भारताची सर्वात मोठी एसएफ़बी आणि इक्सिगो (ixigo),भारतातील अग्रगण्य असे प्रवास व्यासपिठ एकत्र येऊन कल्पक आणि ग्राहकांना उपयुक्त ठरतील अशा उपाय योजना घेऊन येत आहेत, आजच त्यांनी अधुनिक प्रवाशांकरिता एकत्रितपणे प्रिमियम को-ब्रॅन्डेड क्रेडिट कार्डची घोषणा केली. या धोरणात्मक भागीदारीमध्ये एयु एसएफ़बीचा आर्थिकतेमधील अनुभवाची ताकद तसेच इक्सिगो (ixigo) चा 2 टियर आणि 3 टियर गावांमध्ये असलेल्या मजबूत अशा नेटवर्कमुळे , ग्राहकांना भरगोस प्रवास लाभांसह प्रिमियम आर्थिक लाभ आणि बक्षीसे देण्याचा देखील त्यांचा मानस आहे.

इक्सिगो (ixigo-AU)  एयु को-ब्रॅन्डेड क्रेडिट कार्डमुळे ग्राहकांना भव्य , आकर्षक आणि अविस्मरणीय अशा प्रवासाचा अनुभव घेता येणार असून तो सगळ्याच माध्यमांचा मार्गाने घेता येऊ शकेल म्हणजेच विमान, रेल्वे, बस आणि हॉटेल्स. या को-ब्रॅन्डेड कार्डमुळे, ग्राहकांना विमान, बस आणि हॉटेल बुकिंक इक्सिगो ( ixigo)चा व्यासपिठावरून केल्यास 10% पर्यंतची सूट मिळणार आहे. इक्सिगो-एयु( ixigo-AU) को-ब्रॅन्डेड क्रेडिट कार्डमध्ये रेल्वे प्रवासाकरिता विशेष सवलती उपलब्ध आहेत ज्यामुळे तुमचा रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि आनंददायी होऊ शकेल. या कार्डमुळे ट्रेनचा तिकिटांवरती महिन्यातून दोनदा पेमेंट गेटवेला लागू होणारे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याशिवाय ऑफ़लाईन आणि ऑनलाईन खरेदीवरती विशेष बक्षीसंदेखील मिळतील. त्याशिवाय ओटीए ट्रॅव्हल कार्ड हे एकमेव कार्ड आहे जे वर्षभर 8 रेल्वे आणि 8 डोमेस्टिक विमानतळांचा लाऊंजसह (कोणत्याही खर्चाचा निकषांविना) एका आंतरार्ष्ट्रीय लाऊंजला  प्रवेश मिळवून देऊ शकेल (विनंती केल्यास प्राधान्य पास उपकब्ध करून दिले जातील) . 

या शिवाय बोनस म्हणून, ग्राहकांना 1000 रिवार्ड पॉईंट देखील मिळणार आहेत तसेच रू.1000 इक्सिगो मनी (ixigo money) उपलब्ध असेल जे कार्ड दिल्यापासून पहिल्या 30 दिवसांमधील पहिल्या यशस्वी व्यवहाराकरिता वापरता येऊ शकतील. 

इक्सिगो-एयु एसएफ़बी (ixigo-AU SFB) चा पहिल्या को -ब्रॅन्डेड क्रेडिट कार्डचा लॉंचचा वेळी बोलताना, एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंकेचे एम.डी आणि सीईओ असलेले संजय अगरवाल म्हणाले, वर्ल्ड ट्रॅव्हल आणि टुरिझम काऊन्सिल (WTTC) असे सूचविते की प्रवास क्षेत्रामध्ये आता पुन्हा एकदा लक्षणीय वाढ होणार आहे, त्यांचा नुसार 2024 मध्ये वार्षिक वाढीचा विचार केला तर ती 20.7% एवढी असेल, जी महामारी पुर्वीचा स्तरांना देखील मागे टाकणारी आहे. या विकासामुळे भारतीय प्रवाशांची 2023 पेक्षा खर्च करण्याची मानसिकता बऱ्यापैकी वाढणार असल्याचे लक्षात येते आहे. याचाच अंदाज घेऊन एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक यांनी इक्सिगो सह भागीदारी करण्याचे ठरविले , ज्यामुळे येणाऱ्या अब्जावधी वापरकर्त्यांकरिता एक उत्तम प्रवास व्यासपिठ निर्माण होऊ शकेल आणि प्रवास प्रेमींकरिता असमानंतर अशा बॅंकिंग सेवा देखील उपलब्ध असतील. इक्सिगो-एयु क्रेडिट कार्ड (ixigo-AU Credit Card) एयुचा बॅंकिंगमधील कल्पकता दिसून येते तसेच इक्सिगो (ixigo’s)चे प्रवासामधील नेतृत्व याच दोन्हीचा भरवशावर, नवी बक्षीसे आणि सहजतेचा मार्ग सुरू होणार आहे.

इक्सिगो  (ixigo )चे सहसंस्थापक रजनिश कुमार आणि आलोके बाजपयी यावेळी बोलताना म्हणाले, “ इक्सिगो (ixigo) येथे आमचा भर हा नेहमीच कल्पक अशा उत्पादनांचा निर्मीतीवर असतो तसेच प्रवासाचा आठवणी या नेहमीच चांगल्या असाव्या म्हणून आम्ही उत्तम सेवा देखील प्रदान करतो. एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंकेबरोबर भागीदारी करताना आम्हाला अतीशय आनंद होतो आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे को-ब्रॅन्डेड क्रेडिट कार्ड लॉंच करत आहोत. या एकत्रिकरणामुळे आमचा प्रवाशांना, उत्तम, भरघोस आणि अविसमरणीय अशा प्रवासाचे आमचे ध्येय आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकू असा आम्हाला विश्वास आहे. या कल्पक अशा कार्डमुळे आम्ही प्रवास अनुभवाची नवीन व्याख्या करणार असून, यामुळे ग्राहकांना अधिक क्रेडिट आणि विविध लाभ नक्कीच मिळतील.

व्यवहारानंतर ग्राहकांना इंधनावरती देखील 1 टक्का सूट मिळणार आहे, ज्यामुळे आता प्रत्येक ड्राईव ही परवडणारी ठरू शकेल. कार्डाचे वार्षिक शुल्क हे फ़क्त रू.999+ जीएसटी असणार आहे, ज्यासह पहिल्या 30 दिवसांचा रू.1000 चा खरेदीवरती ते देखील माफ़ केले जाईल. याशिवाय, चालू वर्षामध्ये किमान रू. 1 लाखाची खरेदी केल्यास  येणाऱ्या वर्षाचे वार्षिक शुल्क देखील माफ़ केले जाईल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading