Thursday, September 3, 2026
ENTERTAINMENTLatest News

अक्षरा अधिपतीमध्ये फुलणार प्रेमाचं नातं !

नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे आणि सगळीकडे दिवाळीची लगबग चालू आहे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सोबतच प्रेक्षकांची आवडती मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत दिवाळीत अक्षरा आणि अधिपतीमधे प्रेमाचं नातं खुलताना दिसणार आहे. येत्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल अक्षरा आणि भुवनेश्वरीमध्ये शाळेत जाण्यावरून मतभेद होणार आहेत. बायको की आई ह्या परिस्थिती मूळे अधिपतीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही तारेवरची कसरत अधिपती कशी निभावून नेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ रात्री ८ वाजता आपल्या वाहिनी झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading