Thursday, September 3, 2026
Latest NewsNATIONAL

एअर इंडियातर्फे १५ डिसेंबरपासून मुंबई आणि मेलबर्न दरम्यान नॉन-स्टॉप उड्डाणे सुरू

गुरुग्राम : भारतातील अग्रगण्य जागतिक विमान कंपनी एअर इंडिया जागतिक मार्ग नेटवर्क विस्तारत असताना मुंबईहून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी प्रथमच नॉन-स्टॉप सेवा सुरू करणार असल्याचे आज जाहीर केले.

एअर इंडियाची १५ डिसेंबर २०२३ पासून मुंबई आणि मेलबर्न दरम्यान आठवड्यातून तीन वेळा ही फ्लाइट असेल. एअर इंडिया हे सध्या मुंबई आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचे एकमेव नॉन-स्टॉप ऑपरेटर आहे.

नवीन मुंबई-मेलबर्न सेवा ऑस्ट्रेलियन राज्य व्हिक्टोरियामध्ये दरवर्षी सुमारे ४०,००० सीट्सची भर घालेल. ऑस्ट्रेलियातील एकूण भारतीय समुदायाच्या सुमारे ४०% म्हणजे साधारण २००,००० पेक्षा जास्त भारतीय समुदाय या राज्यात असल्याचा अंदाज आहे. मित्र आणि नातेवाईकांना भेट देण्याचे वाढते प्रमाण तसेच व्यवसाय आणि या भागात फिरायला जणाऱ्यांचे वाढते प्रमाण यांना प्रतिसाद देणे हे या नवीन सेवांचे उद्दिष्ट आहे.

एअर इंडियाचे चीफ कमर्शिअल आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर निपुण अगरवाल म्हणाले: “आम्ही मुंबई आणि मेलबर्न दरम्यान एकमेव नॉन-स्टॉप फ्लाइट सुरू करण्यास उत्सुक आहोत. आमच्या चालू असलेल्या परिवर्तन कार्यक्रमातील हे एक मोठे पाऊल आहे. त्याच्या इतर पैलूंबरोबरच भारताला नॉन-स्टॉप फ्लाइट्ससह अधिकअधिक जगाशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. या मार्गावरील प्रवाशांना एअर इंडियाच्या उड्डाणाचा सकारात्मक अनुभव दाखविण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामध्ये  उत्कृष्ट भारतीय आदरातिथ्य हा याचा आधारस्तंभ राहील.”

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्य सरकारच्या रोजगार आणि उद्योग मंत्री नताली हचिन्स म्हणाल्या: “मुंबईहून ऑस्ट्रेलियाला जाणारी पहिली थेट विमान उड्डाणे मेलबर्नमध्ये उतरतील याबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. या नवीन मार्गामुळे पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक रोजगार निर्माण होतील आणि व्हिक्टोरियन व्यवसायांसाठी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एकापर्यंत पोहोचण्याचे आणखी काही मार्ग खुले होतील.”

१७ भारतीय शहरांतील प्रवासी दिल्ली किंवा मुंबई मार्गे मेलबर्नला आणि तेथून सोयीस्कर, वन-स्टॉप कनेक्शन घेऊ शकतात. नवीन मुंबई-मेलबर्न मार्ग दिल्ली आणि मुंबई मार्गे लंडन हिथ्रो आणि मेलबर्न दरम्यान अखंड दुतर्फा कनेक्टिव्हिटीही सक्षम करत आहे.

मुंबई-मेलबर्न मार्गावरील उड्डाणे एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाद्वारे होतील.  त्यामध्ये बिझनेस क्लासमध्ये १८ फ्लॅट बेड आणि इकॉनॉमीमध्ये २३८ प्रशस्त जागा असतील.

मुंबई आणि मेलबर्न दरम्यानच्या फ्लाइट्सचे वेळापत्रक

Flight # Days of Operation From To Departure Arrival
AI310  

बुधवार, शुक्रवार, रविवार

मुंबई मेलबर्न 0050 Hrs 1810 Hrs
AI311  

बुधवार, शुक्रवार, रविवार

मेलबर्न मुंबई 2000 Hrs 0235 Hrs (+1)

स्थानिक वेळेनुसार निर्गमन आणि आगमन वेळा दर्शविल्या जातात. +हे पुढील दिवशी आगमन सूचित करते.

एअर इंडियाच्या वेबसाइटवर (www.airindia.com), मोबाइल अॅप आणि जगभरातील ट्रॅव्हल एजंट यांच्या द्वारे तिकीट बुकिंग करता येणार आहे. इकॉनॉमी विभागात राऊंड ट्रीप प्रमोशनल सर्व-समावेशक भाडे प्रति व्यक्ती ४८,९९९ रुपये पासून सुरू होत आहे.

एअर इंडिया सध्या मुख्यालय दिल्लीतून मेलबर्न आणि सिडनीसाठी दररोज विमान उड्डाण सेवा देत असून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दर आठवड्यात २८ वेळा उड्डाणे होत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading