संविधानदिन तसेच जुन्नर लेणी संवर्धनासाठी केंद्र सरकार पत्रव्यवहार करणार
सुनील माने यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना विंनती
पुणे : महाराष्ट्रात यावर्षीचा संविधान दिवस Preamble-‘प्रास्ताविका’चे महत्व सांगण्याची थीम घेऊन महाराष्ट्रात साजरा करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करावा तसेच जुन्नरच्या बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारशी समन्वय साधावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले यांच्याकडे ज्येष्ठ पत्रकार व कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केली. दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे पत्र दिले. माने यांच्या विनंती नंतर त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्याचे मान्य केले.
सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली भारताच्या महामाहीम राष्ट्रपतींनी संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये संविधानाची प्रस्ताविका वाचून संविधान दिन समारंभाचा शुभारंभ केला होता. यावेळी, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, मंत्री, संसद सदस्य, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याबाबत भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १३ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्राद्वारे निर्देश जारी केले होते. याबरोबरच प्रास्ताविका वाचनाचा कार्यक्रम सर्व कार्यालयांमध्ये सर्व ठिकाणी आयोजित करण्यात यावा. इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये प्रास्ताविका वाचन करावे. ‘संविधानिक लोकशाही’ या विषयावर ऑनलाइन प्रश्नमंजुषा कार्यक्रम घ्यावा. तसेच, संविधान जागृतीसाठी वेबिनर, इतर कार्यक्रम आयोजित करावे. अशा सूचना संसदीय कार्य मंत्रालयाने केंद्राच्या सर्व मंत्रालयीन विभागांना दिल्या होत्या.
केंद्र शासनाप्रमाणे राज्य सरकारनेही याबाबत आदेश पारित करून संविधान दिन साजरा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा समाजिक न्याय मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना आपण पत्र द्यावे अशी मागणी मी केली. याआधीच्या सरकारकडेही मी याबाबत मागणी केली होती.
याबरोबरच पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे सातवाहन कालीन बौद्ध लेण्या आहेत. हा लेणी समूह भारतातल्या सर्वात मोठा लेणी समुह आहे. संपूर्ण देशात ही लेणी सर्वात मोठी असल्याने देशव्यापी म्हणून याकडे पाहण्याची गरज आहे.
बौद्ध धर्माला मोठी परंपरा असल्याने निधी उपलब्ध करून या लेणी समूहाचा जागतिक धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास जगभरातील पर्यटक या भागाकडे आकर्षित होतील. बौद्ध लेण्यांचा समूह असलेल्या जुन्नरचा जागतिक पर्यटन स्थळाच्या धर्तीवर राज्य व केंद्र सरकार दोन्हींच्या माध्यमातून या विकास व्हावा अशी अपेक्षा आहे. या लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी डीपीआर तयार करणे गरजेचे आहे. याबाबत मी सर्वपक्षीय नेत्यांना विनंती करत आहे. आपणही याबाबत केंद्र सरकारशी त्याचबरोबर भारतीय पुरातत्व विभाग, राज्य शासन यांच्याशी पत्रव्यवहार करावा अशी विंनती या पत्राद्वारे त्यांनी केली. मा. आठवले यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत याबाबत मुख्य्मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्याचे मान्य केले.
