Friday, September 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वंचित बहुजन आघाडीची मुंबईत संविधान बचाव महासभा !

 

‘वंचित’कडून आज सभेची घोषणा

मुंबई – वंचित बहुजन आघाडीकडून येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत “संविधान बचाव महामोर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे. पक्षाकडून समाज माध्यमांवर त्या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यातच 25 ऑक्टोबर रोजी अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. तर चार-पाच दिवसांपूर्वी धुळे, सटाणा या ठिकाणी आदिवासी हक्क परिषद मोठ्या संख्येने पार पडल्या होत्या आणि अशातच आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ही महासभा होणार आहे. या सभेत काय घोषणा होते? अॅड. प्रकाश आंबेडकर काय बोलतात? याकडे सर्व जाणकारांचे लक्ष लागून आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading