प्रणेती लवंगे खर्डेकर यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तज्ञ व्यक्तीचे चे मार्गदर्शन व योगदान असावे या साठी महाराष्ट्र वन विभागातर्फे प्रणेती लवंगे यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या प्रतिष्ठित मानद पदावर लवंगे यांची नियुक्ती ही नागपूर जिल्ह्यातील वन परीक्षेत्रातील समृद्ध जैवविविधता जतन करण्यासाठी कार्य करण्याच्या उद्देश्याने करण्यात आली आहे.
या नियुक्ती नंतर लवंगे यांनी आज महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व मानद वन्यजीव रक्षक म्हणून नागपूर जिल्ह्यात काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच आपल्या भावी योजनांचे सादरीकरण करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. मा. सुधीरभाऊ यांनी सौ. प्रणेती लवंगे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. सौ. प्रणेती यांनी “राज्यातील पर्यावरण रक्षण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात संवेदनशीलतेने कार्य करणाऱ्या राज्याच्या कार्यक्षम मंत्री महोदयांकडून मिळालेली ही मान्यता व प्रोत्साहन माझ्या नियुक्तीचे महत्त्व आणि या प्रदेशातील वन्यजीव संवर्धनासाठीचे माझे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करते, अशी भावना व्यक्त केली.पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात काम करताना कोथरूड चे आमदार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कायम प्रोत्साहन दिल्याचे ही प्रणेती यांनी आवर्जून नमूद केले.
नागपूर जिल्ह्यातील नैसर्गिक अधिवास आणि वन्यजीव लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये मानद वन्यजीव रक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.या मानद पदावरील व्यक्ती नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी तसेच वन्यजीवांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शिकार, अधिवास नष्ट करणे कामी मोलाची भूमिका बजावतात.तसेच मानव-वन्यजीव संघर्षाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी वन विभागाला मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वन्यजीव रक्षकाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.
