Friday, September 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

झी मराठी अवॉर्डच्या मंचावर झालं अप्पीचं डोहाळेजेवण !

मालिका विश्वातील मानाचा आणि झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’.  दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.  कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् यांनी कार्यक्रमाला एक वेगळीच बहार आणली. या सगळ्यासोबतच आणखी एक कार्यक्रम गाजला तो म्हणजे आपल्या ‘अप्पीचं डोळहळेजेवण’. झी मराठीच्या सर्व नायिकांनी मिळून अप्पीचे डोहाळे पुरवले, कलेक्टर अप्पीची PA म्हणजेच छोट्या छकुलीने एक धमाकेदार नृत्य केलं. सोबतच ह्या डोहाळेजेवण कार्यक्रमात हजेरी लावली ती बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने, माधुरीने अर्जुनला अप्पीची काळजी घेण्याचा प्रेमाचा सल्ला पण दिला. ह्या डोहाळेजेवण कार्यक्रमात अप्पीचं  कौतुक करायला आलेल्या सगळ्यांनी पेढा की बर्फी अशी गोड विचारणा देखील  केली. काय असेल ह्या डोहाळेजेवण कार्यक्रमात पेढा की बर्फी ?  तेव्हा पाहायला विसरू नका ‘अप्पीच्या डोहाळेजेवणाचा’ हा धमाकेदार कार्यक्रम  ‘झी मराठी अवॉर्ड २०२३’, शनिवार ४ नोव्हेंबर, संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

घरचं कार्य आहे सहकुटुंब सर्वाना आग्रहाचं निमंत्रण.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading