Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सैनिक मित्र परिवाराच्यावतीने एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार यांचा सन्मान

पुणे : भारतीय संस्कृतीमधे, दसरा म्हणजे मांगल्या बरोबरच शौर्याच्या पूजनाची ऐतिहासिक परंपरा आहे. परंपरेची जपणूक करताना, आपल्या लष्कराच्या, पराक्रमी सेनाधिका-यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आणि सन्मान हे ओघानेच आलेच. याचे औचित्य साधून सैनिक मित्र परिवाराच्यावतीने एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार आंणि त्यांच्या पत्नी माधुरी यांचा सन्मान करण्यात आला.

सणावारांना देवाधर्माची जोड असतेच परंतू देशभक्तीची,कृतज्ञतेची अशी सोनेरी चौकट मनभावन करणारी असते. या उद्देशाने सैनिक मित्र परिवारच्या वतीने सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ही प्रथा सुरू करण्यात आली, अन् ती आजही सुरू आहे. यंदा  सनई चौघडा, तोरण, रंगावलीच्या साथीने पुणेरी पगडी, तिरंगी उपरणे, मोत्याची माळ, गणेशमूर्तीं मिठाई सह इनामदार यांचा साग्रसंगीत सन्मान करण्यात आला. डाॅ अनील कारंजकर, ज्येष्ठ वैज्ञानिक काशिनाथ देवधर, जीतेंद्र रघुवीर यांचे हस्ते व विवीध संस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading