Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांनी पर्यटन नकाशाचा अभ्यास करून महाराष्ट्र समजून घ्यावा – चंद्रकांत पाटील

पुणे : महाराष्ट्र भूगोल समिती ने तयार केलेले वैविध्यपूर्ण नकाशे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करून आपला महाराष्ट्र समजून घ्यावा असे आवाहन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.विविध शाळांना हे नकाशे भेट देण्याच्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भूगोल तज्ज्ञ डॉ. सुरेश गरसोळे,ह्या उपक्रमाच्या प्रमुख प्रकल्पक मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, डॉ. संदीप बुटाला,प्रदेश प्रवक्ते व महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, प्रशांत हरसूले,  कुलदीप सावळेकर, गिरीश खत्री,ऍड. मिताली सावळेकर, तनू खिलारे,प्रभाग 13 चे अध्यक्ष राजेंद्र येडे,श्रीकांत गावडे, अपर्णा  लोणारे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव पी. व्ही.शास्त्री, सहसचिव प्रदीप वाझे, शिशु विहार शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल इंगूळकर,35 शाळांचे मुख्याध्यापक, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचा क्लास ही घेतला. “अभ्यारण्य” म्हणजे काय असे विचारलं असता एका विद्यार्थिनीने “जंगल” असे उत्तर दिले, यावर दादांनी ” अभ्यारण्य म्हणजे जेथे विविध प्राण्यांसाठी संरक्षित असे जंगल” हे स्पष्ट करतानाच “म्हणूनच ह्या पर्यटनाच्या आणि आपला महाराष्ट्र समजून घेण्याच्या ज्ञानाच्या दृष्टीने महानकाश्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कर्वे संस्थेची ही शिशु विहार शाळा आदर्श शाळा व्हावी यासाठी जे जे शक्य आहे ती सर्वतोपरी मदत करण्याचे ही मा. चंद्रकांतदादांनी घोषित केले.यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक आणि सहकाऱ्यांनी राज्यातील एखादी आदर्श शाळा बघावी व तेथे जे आहे त्यातील जे तुमच्या शाळेत नाही ते मी देईन असे जाहीर केले.

डॉ. सुरेश गरसोळे यांनी हे नकाशे तयार करण्यामागची भूमिका स्पष्ट केली व भूगोल म्हणजे फक्त भौगोलिक रेषा नाहीत तर त्यात विविध स्थळांचा नामनिर्देश म्हणजे नकाशा असे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांकडून “आम्ही पर्यावरण रक्षण करू अशी हमी घेतली”.
माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी विदयार्थ्यांकडून गाणी म्हणवून घेतली. मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन व प्रास्ताविक केले, शंतनू खिलारे यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापिका शीतल इंगूळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading