Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘भाबीजी घर पर है’मधील आसिफ शेख व रोहिताश्‍व गौड यांनी लाल किल्‍ला येथे साजरी केली रामलीला

 

मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील कलाकार आसिफ शेख व रोहिताश्‍व गौड त्‍यांच्‍या भूमिका विभुती नारायण मिश्रा व मनमोहन तिवारीसाठी अत्‍यंत लोकप्रिय आहेत. नुकतेच त्‍यांनी नवी दिल्‍लीमधील लाल किल्‍ला येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या लव कुश रामलीला साजरीकरणाचा आनंद घेतला. त्‍यांनी चार वर्षांनी पुन्‍हा एकत्र या साजरीकरणाचा आनंद घेतला. आसिफ शेख यांनी गेल्‍या वर्षी मालिकेमधील त्‍यांची पत्‍नी अनिता भाबीची भूमिका साकारणाऱ्या विदिशा श्रीवास्‍तव यांच्‍यासोबत शहराला भेट दिली होती आणि त्‍यांनी पुन्‍हा एकदा दिल्‍लीमधील दसरा सणाचा आनंद घेतला. त्‍यांनी आपले बहुतांश जीवन दिल्‍लीमध्‍ये व्‍यतित केले आहे. रोहिताश्‍व गौड यांना त्‍यांच्‍या सुरूवातीच्‍या अभिनय दिवसांची आठवण झाली. रामलीला साजरीकरणाचा आनंद घेण्‍यासह प्रख्‍यात इंडिया गेट येथे प्रेमळ चाहत्‍यांची गाठभेट घेत या डायनॅमिक जोडीने दिल्‍लीमधील पाककलांचा आस्‍वाद घेतला, स्‍थानिक ठिकाणी शॉपिंग केली आणि रस्‍त्‍यावर चाहत्‍यांसोबत गप्‍पागोष्‍टी केल्‍या, तसेच शहरातील उत्‍सवी धामधूमीचा आनंद घेतला.
आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले, ”दिल्‍लीमधील रामलीलाचे माझ्या मनात खास स्‍थान आहे. प्रत्‍येक भेटीसह या साजरीकरणाप्रती आणि येथील अविश्‍वसनीय प्रेक्षकांप्रती माझी आवड वाढत आहे. हे साजरीकरण निश्चितच लक्षवेधक आहे, जेथे कलाकार त्‍यांची अपवादात्‍मक कला व प्रतिभा सादर करतात. मी थिएट्रिकल परफॉर्मन्‍सचा चाहता आहे आणि दिल्‍लीमधील रामलीला हे माझ्या पाहिलेच पाहिजे अशा कार्यक्रमांच्‍या यादीमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे. मला रामलीलामध्‍ये सहभाग घेण्‍याची संधी कधीच मिळाली नाही, पण मी माझ्या मित्रांसोबत लाल किल्‍ला येथे जाऊन सर्वात पहिल्‍या रांगेमधील सीट मिळवायचा आणि जवळून परफॉर्मन्‍स पाहण्‍याचा आनंद घ्‍यायचो. आता मला मंचावर लाइव्‍ह पाहण्याची संधी मिळते. उपस्थित जमावामधील उत्‍साह व भावना अविश्‍वसनीय आहे. प्रेक्षकांकडून आम्‍हाला मिळणारे प्रेम व आपुलकीसाठी मी त्‍यांचा कृतज्ञ आहे. हे प्रेम व आपुलकी पाहून माझे मन आनंदाने भरून जाते. पुन्‍हा एकदा माझे सह-कलाकार रोहिताश्‍व (तिवारी जी) माझ्यासोबत चार वर्षांनी हा अनुभव घेण्‍यासाठी सोबत होते. आयोजक व उपस्थित जमावाने प्रेम व उत्‍साहाने आमचे स्‍वागत केले, जे पाहून आम्‍ही भारावून गेलो. ‘दिल्‍लीकरांनी पुन्‍हा एकदा आमचे मन जिंकले!” अभिनेता पुढे म्‍हणाले, ”भव्‍य साजरीकरणामध्‍ये सामील होण्‍याव्‍यतिरिक्‍त रोहिताश्‍व आणि मी दिल्‍लीमधील काही स्‍थानिक स्‍थळ जसे इंडिया गेटला भेट दिली आणि शहरातील आमच्‍या जुन्‍या आठवणींना उजाळा दिला. मी रोहिताश्‍व यांना माझ्या काही आवडत्‍या डायनिंग स्पॉट्सबाबत सांगितले आणि आम्‍ही एकत्र खाद्यपदार्थांचा छान आस्‍वाद घेतला. निश्चितच माझ्यासाठी तो संस्‍मरणीय अनुभव होता.”
रोहिताश्‍व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्‍हणाले, ”रामलीला पाहताना मला माझ्या किशोरवयीन काळाची आठवण झाली, जेथे मी चंदिगडजवळील शहर कालका येथील उत्‍साहपूर्ण सण साजरीकरणामध्‍ये आनंदाने सहभाग घ्‍यायचो. मी अंगद व विभिषणाची भूमिका साकारायचो, पण मनातून मी श्रीरामाची भूमिका साकारण्‍यासाठी उत्‍सुक असायचो (हसतात). राजधानी शहरातील कार्यक्रमाला माझी दुसरी भेट उल्‍लेखनीय होती, माझ्यासोबत माझे प्रिय मित्र व सह-कलाकार आसिफ शेख होते, जे आमच्‍या मालिकेमध्‍ये माझ्या शेजारीची भूमिका साकारतात. आम्‍हाला हे भव्‍य साजरीकरण पाहण्‍याचा, हजारो उत्‍साही लोकांमध्‍ये सामावून जाण्‍याचा सन्‍मान मिळाला आणि तो अनुभव उत्तम होता. एकेकाळी मी नॅशनल स्‍कूल ऑफ ड्रामामध्‍ये असताना या शहरात राहिलो आहे, पण माझ्या व्‍यस्‍त वेळापत्रकामुळे मला शहरामध्‍ये फेरफटका मारण्‍याची संधी मिळाली नाही. पण, आसिफ जी परिपूर्ण सोबती आहेत, ज्‍यांना मला स्‍थानिक पाककला खूप आवडतात हे माहित आहे. त्‍यांनी मला शहरातील सर्वोत्तम पाककला स्‍वादिष्‍ट छोले भटुरे ते दिल्‍लीमधील प्रसिद्ध चाटचा आस्‍वाद दिला. आम्‍ही चाहत्‍यांसोबत गप्‍पागोष्‍टी देखील केल्‍या आणि आमच्‍या भेटीदरम्‍यान त्‍यांनी दाखवलेले प्रेम व आपुलकी सदैव माझ्या स्‍मरणात राहिल. मी पुन्‍हा-पुन्‍हा या शहराला भेट देण्‍यास उत्‍सुक आहे.”
आसिफ शेख यांना विभुती नारायण मिश्राच्‍या भूमिकेत आणि रोहिताश्‍व गौड यांना मनमोहन तिवारीच्‍या भूमिकेत पाहण्‍यासाठी पाहत राहा ‘भाबीजी घर पर है’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading