Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘उत्सव नात्यांचा,सण दसऱ्याचा’

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झी मराठीसोबत साजरा करूया ‘उत्सव नात्यांचा, सण दसऱ्याचा’. सगळीकडे नवरात्री जल्लोषात साजरी  होत आहे. दसऱ्याच्याही  सगळीकडे तयारी सुरु झाली आहे.

आता ह्या तयारीत झी मराठीचे आपले  आवडते  कलाकार कसे मागे राहतील, ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘सारं काही तिच्या साठी’, ‘तू चाल पुढं’,‘तुला शिकवीन चांगलाच धडा’,’नवा गडी नवं राज्य’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘३६ गुणी जोडी’,‘चला हवा येऊ द्या’आणि  ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या छोट्या स्पर्धकांनी सुद्धा ‘उत्सव नात्यांचा,सण दसऱ्याचा’ ह्या कार्यक्रमात चारचाँद लावणार आहेत.

अप्रतिम सूत्र संचालन, सुंदर  गायकी व बहारदार नृत्य ह्या सर्व कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

हा कार्यक्रम  २२ ऑक्टोबरला रोजी म्हणजेच येत्या रविवार दुपारी १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी मराठी पाहता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading