Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ससून रुग्णालयातून फाररा झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील अखेर अटकेत 

मुंबई : पुण्यातील ससून रुग्णालयातून फाररा झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याला पंधरा दिवसा नंतर आज अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी चेन्नईमार्गे श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत असताना मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजार केले असता ललित पाटीला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाका येथील ड्रग्ज प्रकरणात तपास करत असताना पोलिसांनी नाशिक येथील एका मोठ्या ड्रग्ज कारखान्यांवर छापा टाकला होता. तेव्हा आरोपी ललित पाटील याचे नाव या प्रकरणात पहिल्यांदा समोर आहे. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी अगदी शिताफीने माहिती काढत ललित पाटीला अखेर रात्री चेन्नई येथे अटक केली आहे.

दरम्यान, ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ललीतचा भाऊ भूषण याला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र सासून रुग्णालयातून पलायन झाल्यापासून 15 दिवस ललीत पाटील चा तपास लागत नव्हता अखेर काल रात्री मुंबई पोलिसांनी ललीतला चेन्नई येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading