Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले

मुंबई : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी माझ्यावर केलेल्या आरोपा नंतर मी त्या प्रकरणाची कागदपत्र परत पाहिली. त्या भूखंडाशी माझा काहीही संबंध नव्हता. या प्रकरणाशी संबंधीत कोणत्याही बैठकीत मी नव्हतो. अथवा कोणत्याही कागदावर माझी सही नाही. सरकारचे नुकसान होईल असा कोणतेही निर्णय मी घेतलेला नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोप फेटाळले आहेत. यावेळी अजित पवार यांनी तात्कालीन शासन आदेश वाचून दाखवले.

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या Madam commissioner या आत्मचरित्रात  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी  2010 मध्ये येरवडा येथील पोलीस दलाची तीन एकर जागा एका बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार म्हणाले, एखाद्या भूखंडावर काय करायचे असेल तर त्यासाठी संबंधीत खात्याची परवानगी घेवून जागा महसूल विभागाकडे हस्तांतरीत करावी लागते. त्यानंतर ती  दुसऱ्या कोणाकडे सोपवली जाते. काम रखडू नये म्हणून आढावा घेतला जातो. परंतु आढावा घेतला म्हणजे निर्णय बदलला असे होत नाही. मी कधी ही तात्कालिन गृहमंत्री आर आर पाटलांना असं करा तसं करा असे सांगितले नाही.

चौकशी कोणाची करणार ?

पवार म्हणाले, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी आपल्या आत्मचरित्रात त्या भूखंडाचा उल्लेख केला आहे. तो भूखंड आजही पोलिसांच्या, गृह विभागाच्या ताब्यातच आहे. तात्कालिन भूखंडासाठी जेव्हा आढावा बैठक झाली तेव्हा मी या प्रकरणा बाबद आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत बोरवणकर यांनी जागा हस्तांतरांसाठी नकार दिल्यावर तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. मग आता चौकशी कशाची करायची? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading