वाचन प्रेरणा दिनानिमित्त जाधवर इन्स्टिटयूट मध्ये १ हजार पुस्तकांचे प्रदर्शन
पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट मध्ये तब्बल १ हजार पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पुस्तकांमधील एका गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने वाचत त्यातील संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांसह इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी निवृत्त शिक्षिका संजया वरुडे, प्रा. सोनू नानगुडे आदी उपस्थित होते. वाचनाचे महत्व समजून घेण्यासोबतच विविध लेखकांची पुस्तके देखील विद्यार्थ्यानी यानिमित्ताने वाचली. तसेच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट देखील समजून घेतला.
संजया वरुडे म्हणाल्या, वाचन प्रेरणा दिन हा भारतात साजरा होतो. डॉ. कलाम ज्या ज्या देशात जायचे तेथे त्यांना डॉक्टर पदवी मिळाली. त्यांच्याकडे २५०० पुस्तके आणि ४० डॉक्टरेट पदवी होती, बाकी संपत्ती त्यांच्याकडे नव्हती. माणसाच्या कपडयांनी मोठेपणा दिसत नाही, तुमच्या विचार दिसतो. डॉ. कलाम यांचा हा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला हवा. वाचन आपल्याला जगायला शिकवते. आज सगळे जण मोबाईलचे फॅन आहेत. मोबाइल मधून बाहेर या आणि पुस्तकांच्या सानिध्यात रहा, असेही त्यांनी सांगितले.
