अभाविप ने शिक्षणासोबतच विविध विषयांवरील विद्यार्थ्यांचे सल्ले आमंत्रित केले आहेत
देशभरातील विद्यार्थ्यांच्या सल्ल्यांवर आधारित प्रस्तावांना अभाविप च्या दिल्ली राष्ट्रीय अधिवेशनात पारित करण्यात येईल
अखिल विद्यार्थी परिषदेने देश-भराच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अध्ययनरत विद्यार्थांना शिक्षण, समाज,सम सामायिक विषय, तसेच पर्यावरणासह विविध विषयांवर त्यांचे सल्ले देण्यास आमंत्रित केले आहे. विद्यार्थी उपर्युक्त उल्लेखित विषयांवर आपले सल्ले अभाविप च्या फेसबुक, एक्स (पूर्व ट्वीटर), इंस्टाग्राम आदि सोशल मीडिया हॅ़ंडल्स वर उपलब्ध गूगल फॉर्म द्वारे किंवा abvpyagywalkya@gmail.com या मेल आयडी वर पाठवू शकता.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देश-भरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांकडून प्राप्त सल्ल्यांवर आधारित प्रस्ताव तयार करेल. या प्रस्तावांना अभाविप च्या दिल्ली मध्ये ३० नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात आलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्यां सोबत चर्चा करून पारित केले जाईल.
अभाविप च्या राष्ट्रीय अधिवेशनांत तसेच राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकांत शिक्षणासह विविध विषयांवर वर चर्चा करून प्रस्ताव पारित केले जातात. तसेच, त्या पारित प्रस्तावांवर अभाविप च्या संपूर्ण देशभरातील शाखांद्वारे विद्यार्थी – युवकांना सोबत घेऊन कार्य करण्यात येते, व सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न केला जातो, हे उल्लेखनीय आहे.
अभाविप चे राष्ट्रीय महामंत्री श्री. याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, “देशभरातील विद्यार्थ्यांना अभाविप विविध विषयांवर वर अभाविप च्या प्रस्तावांनिमित्त आपले मत, व सल्ले देण्यासाठी आवाहन करते. शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय व पर्यावरणाशी निगडित विषय निरंतर परिवर्तनशील आहेत. या विषयांवर भारतीय युवकांच्या विचारांना देशाच्या नीती मध्ये उचित स्थान मिळायला हवे. अभाविप च्या अमृतमहोत्सवी अधिवेशनात विद्यार्थ्यांकडून प्राप्त विषयांवर चर्चा करून आगामी कार्य योजना सुनिश्चित केली जाईल.
