Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

Review : ‘शांतीत क्रांती – 2’

सोनी लिव्ह वरील ‘शांतीत क्रांती – 2‘ वेबसिरीज मधून प्रसन्न, दीनार आणि श्रेयस या तीन मित्रांचा याराना पुन्हा एकदा तरुणाईला हसवायला आणि मनोरंजन करायला आलेला आहे. ‘शांतीत क्रांती’च्या पहिल्या सीजनमध्ये गोव्याच्या नावाखाली शांतीवनमध्ये घेवून गेलेला श्रेयस (अभय महाजन), Good news मिळाल्यानंतर टेंशन आलेला प्रसन्न (ललित प्रभाकर) अन् तेथे जावून रेव्ह पार्टी करणारा दीनार (आलोक राजवाडे) आता ‘शांतीत क्रांती – 2’ मध्ये काय करणार यांची खूप उत्सुक्ता होती. अपेक्षे प्रमाणे या तिघांनीही दुसऱ्या भागात  प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे; तर जाणून घेऊया ही वेबसिरीज नक्की कशी आहे.

‘शांतीत क्रांती भाग १’ च्या १८ महिन्यांनंतर भाग दोन ची सुरूवात होते. वेबसिरीजच्या या सीजनाच्या कथानकाबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे, आता  प्रसन्नला मुलगी झाली असून तो तिच्या विषयी over protective आहे. तर रुपाली सोबत break up झाल्यानंतर श्रेयसचे लग्न त्यांच्या समृद्धी (प्रियदर्शनी इंदलकर)  सोबत त्याला फारसे विचारात न घेता ठरवलेले आहे. तसेच  दिनारने दारू सोडली असून तो आता आध्यात्माच्या मार्गावर आहे.  दरम्यान श्रेयसची  त्यांच्या टुरिस्ट कंपनीवर डायरेक्टर झाल्याच्या पार्टीत हे तिघे पुन्हा एकदा भेटतात; अन् mind fresh करण्यासाठी व  श्रेयसची बॅचलर पार्टी करण्यासाठी इंटर नॅशनल ट्रीप करण्याचे प्लॅन करतात. पण त्यांच्या प्लॅनचा फज्जा उडतो आणि त्यांच्या नशिबी चक्क भक्ती यात्रा येते. या यात्रेत नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी ‘शांतीत क्रांती 2’ बघायला हवी.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगयाचे तर आलोक, ललित आणि श्रेयस या त्रिकूटाने या सीझन मध्येही कलाम केली आहे.  प्रसन्नच्या बायकोच्या भूमिकेत मृण्मयी गोडबोले असून तिच्या वाट्याला आलेले काम तिने चोख बजावले आहेत. प्रियदर्शनी इंदलकर ने समृद्धी ची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे.

पुण्यातून सुरू झालेल्या या तिघांच्या प्रवासात प्रेक्षकांना मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश,  उत्तराखंड आणि नेपाळचा सीमाभागाची सफर घडते. तरुणाईच्या तोंडांतले संवाद, कॉमेडीच्या अंगाने मांडण्यात आलेली तरुणांची भावनिक, मानसिक अवस्था यामुळे ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या मनाला जावून भिडते. भाडीपा ची निर्मिती असल्याने संवादातून अनेकदा भाडीपाची झलक दिसते. शेवटी काय तर धकाधकीच्या आयुष्यात डोकं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त entertainment म्हणून ‘शांतीत क्रांती – 2’ वेबसिरीज पहाणे हा एक पैसा वसूल पर्याय आहे.

वेबसिरिज – शांतीत क्रांती -2

दिग्दर्शन – सारंग साठे, पॉला मॅकग्लिन

कलाकार – आलोक राजवाडे, ललित प्रभाकर, अभय महाजन, प्रियदर्शनी इंदलकर, मृण्मयी गोडबोले.

ओटीटी प्लॅटफॉर्म –  सोनी LIV

रेटिंग – ***

  • प्रज्ञा भोसले – पंडित 
  • maharashtralokmanch@gmail.com

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading