मैथिली कलामंदिर संगीत सभागृहाला संगीतसूर्य केशवराव भोसले नाव देण्याची घोषणा
पुणे : संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 102 व्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा व संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद आणि मैथिली कला मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला होता.
त्याच्या संगीत नाट्य कारकिर्दीला उजाळा देणारा सुरेल संगीतमय सोहळा नमन संगीत सूर्याला हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रसिद्ध अभिनेते व तज्ञ व्याख्याते संजय गोसावी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व रंजक असे संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे व्याख्यान दिले आणि शास्त्रीय गायिका विदुषी सानिया ताई पाटणकर यांनी केशवराव भोसले यांच्या संगीत मानापमान नाटकातील युवती मना दारुण मज.. या सुरेल बहारदार नाट्य पद सादरीकरणाने रसिक श्रोत्यांची मने जिंकली. आज मैथिली कलामंदिर चे सर्वेसर्वा मिलिंद माळी यांनी त्याच्या संगीत सभागृहाला संगीतसूर्य केशवराव भोसले नाव देण्याचे घोषीत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे नाट्य परिषद अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले व केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या अध्यक्षा वर्षा ताई धाबे तसेच कार्याध्यक्ष अजित शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार नाट्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद रणनवरे यांनी मानले. निवेदन संचालिका शोभा कुलकर्णी केले. नाट्यपरिषदेच्या संचालिका रेश्मा परितेकर, शेखर लोहकरे , शशिकांत कोठावळे, अशोक जाधव , तसेच अनिल अण्णा गुंजाळ आणि अनेक रसिक प्रेक्षक उपस्थीत होते.
