Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संघाला विजेतेपद

पुणे : जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल संघाने कस्तुरबा गांधी विद्यालय संघाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले.

अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल संघाने अंतिम लढतीमध्ये ४-३ होमरन्सनी पराभूत केले. या लढतीमध्ये अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल संघाकडून युसूफ मुजावर, सफवान कुरेशी व अफाक कुरेशी यांनी दमदार खेळ करताना संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल संघाने मॉडर्न हायस्कूल संघाला १६ -६ अशा होमरन्सने पराभूत करताना स्पर्धेची अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या लढतीमध्ये अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल फरहान शेख व अब्दुल गनी यांनी सुरेख खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला.

उपांत्यपूर्व फेरीत अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल संघाने वॉलनट हायस्कूलचा संघाला १५-११ असे ४ होमरन्सने पराभूत करताना उपांत्यफेरी गाठली. यावेळी अँग्लो उर्दू बॉईज संघाकडून सफवान कुरेशी व युसूफ मुजावर- पिचर अतितटीच्या लढतीत  संघाला विजय मिळवून दिला.

सॉफ्टबॉलच्या १४ वर्षांखालील गटाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख,  अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक राज मुजावर, क्रीडा शिक्षक मजीद सय्यद, खालिद बगबान यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading