Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

Pune Crime : सराईत बंटी चव्हाण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे- पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी शरीराविरुद्ध मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार तसेच लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोक्का सारख्या कठोर कायदेशीर कारवायांचा धडाका सुरू ठेवलेला आहे.

चतुशृंगी  परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या आयुष उर्फ बंटी चव्हाण व त्याच्या टोळी विरुद्ध पुणे शहरातील ६८ वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली. यामध्ये टोळी प्रमुख आयुष उर्फ बंटी विठ्ठल चव्हाण (वय 21, रा. गोखलेनगर,पुणे), बाबू उर्फ बाबा सूर्यकांत डोंगरे (वय 19, रा. वडारवाडी,पुणे), कृष्णा राजू पवार (वय 19, रा. वडारवाडी पुणे) तसेच मयूर उर्फ गणेश सुनील विटकर (वय 21, रा. वडारवाडी पुणे)या चार सराईत गुन्हेगारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख बंटी चव्हाण सह इतर दोन गुन्हेगार अटक असून फरार मयूर विटकर याचा शोध पोलीस घेत आहेत.

आयुष उर्फ बंटी चव्हाण हा त्याच्या साथीदारांसह संघटित टोळी तयार करून अवैध मार्गाने आर्थिक व इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे सातत्याने करत होता. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, नागरिकांच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करणे अशाप्रकारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत होता. चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कारवाई करण्या बाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिल्यानंतर या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, पोलिस अंमलदार अमित गद्रे,सुहास पवार यांनी ही कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading