Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

रक्तदान हि मानवतेची सर्वोच्च सेवा : २७८ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान..

पुणे:   सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील कोथरूड ब्रांच अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन ८ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये २७८ जणांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले,ज्यामध्ये निरंकारी भक्तांबरोबर समाजातील अनेक सज्जनांनी सहभाग घेतला.

संत निरंकारी मिशन रक्तपेढी विले पार्ले यांनी ११३ युनिट तर ससून हॉस्पिटल रक्तपेढी यांनी १६५ रक्त संकलन केले. या शिबिराचे उदघाटन श्री ताराचंद करमचंदानी झोनल प्रमुख पुणे झोन आणि राजा गुलाटी (दिल्ली) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कोथरूड विभागाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील तसेच अन्य नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले. संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत १३ लाखाहून अधिक युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.

बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांपासून मिशनच्या सेवादारांनी कोथरूड परिसरामध्ये रक्तदानाची जनजागृती करण्यात आली, रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार कोथरूड ब्रांच प्रमुख सुधीर वरगडे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading