Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

शांतीत क्रांती २ साठी पहिल्यांदा बस चालवण्याचा अनुभव होता अविस्मरणीय – ललित प्रभाकर

पहिल्‍या सीझनला मिळालेल्‍या घवघवीत यशानंतर सोनी लिव्‍ह १३ ऑक्‍टोबर २०२३ पासून ‘शांतीत क्रांती सीझन २’ सादर करण्‍यास सज्‍ज आहे. तर हास्याच्या डबल डोससाठी तयार राहा कारण या सिझन मध्ये प्रेक्षकांचे आवडते श्रेयस, प्रसन्‍न व दिनार काही साहसी बाबींचा सामना करणार आहेत ज्याने प्रेक्षकांचं मात्र मनसोक्त मनोरंजन होईल. ‘शांतीत क्रांती २’च्‍या शूटिंगदरम्‍यान प्रसन्‍नची भूमिका साकारणारे ललित प्रभाकर यांनी त्‍यांच्‍या जीवनात पहिल्‍यांदाच ड्रायव्‍हर बनत बस चालवण्‍याचा अनुभव घेतला. अभिनय व संवादामध्‍ये संतुलन राखत आणि सर्वांच्‍या सुरक्षिततेची खात्री घेत त्‍यांनी सराईतपणे बस चालवली.
हे आव्‍हानात्‍मक टास्‍क करण्‍याबाबत ललित प्रभाकर म्‍हणाले, ”या सीझनमध्‍ये मी माझ्या जीवनात पहिल्‍यांदाच बस चालवण्‍याचा अनुभव घेतला. मला बस चालवण्‍याच्‍या जबाबदारीसह ड्रायव्हिंग करताना संवाद सादर करण्‍याचे व सीन्‍स परफॉर्म करण्‍याचे आव्‍हान देखील होते. या गुंतागूंतीमध्‍ये अधिक भर म्‍हणजे आम्‍हाला गजबजलेल्‍या रस्‍त्‍यावर शूटिंग करायची होती, जे खूप आव्‍हानात्‍मक होते. असे अडथळे असताना देखील आमचे दिग्‍दर्शक व संपूर्ण टीमने हे आव्‍हान पूर्ण करण्‍याच्‍या माझ्या क्षमतेवर विश्‍वास दाखवला, तसेच सर्वांच्‍या सुरक्षिततेची खात्री देखील घेतली. मला सांगावेसे वाटते की, बस चालवताना भूमिकेमध्‍ये सामावून राहणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक होते. पण, तो अत्‍यंत अनोखा अनुभव होता, जो माझ्या स्‍मरणात सदैव राहिल.”
भडीपासोबत सहयोगाने टीव्‍हीएफद्वारे निर्मित आणि अरूनभ कुमार यांची निर्मिती असलेली सिरीज ‘शांतीत क्रांती २’चे दिग्‍दर्शक सारंग साठये व पौला मॅकग्लिन आहेत. या सिरीजमध्‍ये अभय महाजन, अलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी व प्रियदर्शिनी इंदळकर प्रमुख भूमिकेत आहेत.

पहा ‘शांतीत क्रांती सीझन २’ १३ ऑक्‍टोबरपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading