Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

शहीद नायक शिरीष कुमार भिसे यांच्या कुटुंबाचा गणेश मंडळाच्यावतीने सन्मान

पुणे : गुरूवार पेठेतील वीर शिवराज मंडळाच्यावतीने यंदा कारगिल विजयाच्या २५ व्या  वर्षानिमित्त कारगिल येथील वॉर मेमोरियलची प्रतिकृती व माहितीपट सादर करण्यात आला होता. यावेळी प्रत्यक्ष कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले नायक शिरीष कुमार भिसे (स्नायपर शूटर) यांच्या वीरपत्नी मीनाक्षी शिरीष कुमार भिसे व वीरकन्या हिमाचली शिरीष कुमार भिसे यांना शौर्य पुरस्कार देवून गुरुवार पेठेत सन्मानित करण्यात आले.

मंडळातील महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी सैनिक मित्र परिवाराच्या कल्याणी सराफ, विष्णू ठाकूर, किशोर चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल उपस्थित होते. मंडळातील महिला पदाधिकारी प्रीती कांबळे, रूपाली सोनीवाल, स्नेहल चव्हाण, हेमांगी मिसाळ, जुई पवार तसेच सतीश चव्हाण, विशाल कांबळे, चंद्रशेखर पवार, इब्राहीम खान, परवेज खान इत्यादी उपस्थित होते. यावेळी वीर शिवराज मंडळ व जेएसजे जैन सोशल ग्रुप एजुकॉन यांच्यावतीने एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading