fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

वाघनखे राहू द्या… शिवस्मारकाचं बघा…!! – संभाजी ब्रिगेड

पुणे : भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नेहमी वापर करते. भाजप अडचणीत असली की छत्रपतींचे आठवण होते. सत्तेत यायचं असेल तर छत्रपतींचा आशीर्वाद लागतो आणि सत्ता उपभोगली की मग त्यांच्या विचारांचा विसर पडतो. आज देशात भाजप अडचणीत आहे. सत्तेवर येईल की नाही माहित नाही. महाराष्ट्रात अत्यंत महागाई, बेरोजगारी, जातीवाद या विरोधात जनता भयानक संतापलेली असताना परत छत्रपतींच्या नावाचा आधार घेऊन भाजप सरकारला महागाई, बेरोजगारी ही जनतेला विसरायला लावायचे आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा विषय काढला जातो. अशी टीका करत वाघनखे राहू द्या… शिव स्मारकाचं बघा…!! अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केली आहे. 

शिंदे म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार साहेब आणि भाजपच्या  नेत्यांनो वाघनख 1919 पर्यंत साताऱ्यात होती असा ऐतिहासिक संदर्भ लागतो मग इंग्लंडला गेली कशी? त्यापेक्षा “अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक होणार होते त्याचं काय झालं ते सांगा…?” आणि अगोदर शिवस्मारक करा. विनाकारण लोकांची दिशाभूल करू नका…

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading