लेट फी च्या नावाखाली डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि संशोधन केंद्र आर्थिक लुटमार करत आहे – अभाविप
पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि संशोधन केंद्र, पिंपरी विद्यार्थ्यांकडून “लेट फी” च्या नावाखाली ज्यादा/अन्यायकारक शुल्क आकारत असल्याची माहिती अभाविप ला विद्यार्थ्यांकडून मिळाली. याविषयी इतर काही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यास जाणवले की, “संबंधित महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्याला महाविद्यालयीन शुल्क भरायला विलंब झाल्यास अन्यायकारक दंड आकारुन महाविद्यालय कायद्याचा भंग करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होऊन लाखोंचा फटका बसत आहे. विद्यार्थी कल्याणासाठी कार्य करणारी एक जबाबदार संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या विषयावर संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी आज दि. १८ सप्टेंबर ला संवाद साधला.
यावेळी, अभाविप ने प्राचार्यांना एच.ई.आय. (HEI) धोरणांबद्दल स्पष्टीकरण मागितले, Ug आणि pg विद्यार्थ्यांना घेण्यात येणारी लेट फी घेण बंद करावी, जी आतापर्यत विद्यार्थ्याकडुन लाखो रू लेट फी घेतली आहे ती परत करावी, विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी, विद्यार्थ्यांचे फी मुळे कोणतेही शैक्षणिक नुकसान करू नये अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
Ugc च्या नियमानुसार tuition fees सोडुन अन्य कोणतीही फी महाविद्यालय घेऊ शकत नाहीत पंरतु डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ़ आयुर्वेद महाविद्यालय महाविद्यालय शुल्क वेळेत भरले नाही म्हणुन एकुण शुल्काच्या 18 % व्याज लावुन लेट फी लाखो रू वसुल करत आहे हे नियमबाह्य आहे हे सर्व ugc चे नियम डावलून होत आहे हे अनेक वर्षे विद्यार्थ्यांची लाखो रू.ची लुट करतात याच्या विरोधात ugc ने कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा या साठी विद्यार्थी परिषद मैदानात उतरली आहे, असे वक्तव्य अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री आनंद भुसनर यांनी केले.
अभाविप ने या आर्थिक लुटीच्या विरोध आवज उठवला आहे विद्यार्थ्यांची लेट फी घेणं बंद करावी जी घेतली आहे ती परत करावी, विद्यार्थी हिताच्या मागण्या येत्या 3 दिवसात मान्य नाही केल्या तर अभाविप महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा अभाविप पिंपरी चिंचवड महानगर मंत्री सिद्धेश्वेर लाड यांनी दिला.