Sunday, July 26, 2026
Latest NewsPUNE

प्रियदर्शिनी वुमेन्स फोरम व बिटीया फौंडेशन तर्फे आयोजित गौरी गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन

पुणे : प्रियदर्शिनी वुमेन्स फोरम व बिटीया फौंडेशन तर्फे आयोजित गौरी गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन झाले.ह्या उद्घाटन प्रसंगी ‌सर्व राजकीय नेते महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वलाखे तसेच या.आमदार संग्राम थोपटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, सूर्यदत्ता ग्रुपचे डॉ संजय चोरडिया, मराठी चित्रतारका स्मिता गोंदकर, आरती शिंदे, मॉडेल प्रोड्यूसर राहुल जगताप, ऍड. अभय छाजेड, बाळासाहेब दांडेकर, रफिक शेख , पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, भानुप्रताप बर्गे , लता राजगुरू, वैशाली मराठे आदी उपस्थित होते. माननीयानी रिबीन कापून या जत्रेचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा संगिता तिवारी यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात चैत्राली विश्वास शर्मा हिने गणेश वंदना सादर केली.त्यानंतर गौतमी कुमार अहिर हिने मी मी सावित्री बोलतेय हे एकपात्री नाट्य सादर केले. नंतर दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.वाती ते मूर्ती सर्व एकाच छताखाली १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत चालू रहाणार असून १६ तारखेला पूर्ण रात्रभर ही जत्रा चालू रहाणार आहे. इथे सायंकाळी रोज एक कार्यक्रम चालू रहाणार आहे. दिं. ११ ते १६ तारखेपर्यंत रोज सायंकाळी श्रावण फॅशन क्लीन शो, नऊवारी फॅशन वॉक, बॉलिवूड साॅंग्ज, , बॉलिवूड रेट्रो थीम , महिलांसाठी तंबोरा आणि बरेच कार्यक्रम असणार आहेत.यावेळी खास करून आय‌ टी. मधील लोकांसाठी दिं. १६ रोजी मिडनाईट मार्केट प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली.

सर्व मान्यवरांनी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.पुढील वर्षी आम्ही आमची टीम घेऊन दुबई व लंडन मध्ये ही जत्रा आयोजित करायचा प्लॅन करीत आहे तसेच फक्त १६ ग्रुप बरोबर घेऊन जाणार आहे असा विचार चालला आहे या गौरी गणपती साहित्य जत्रेच्या संयोजिका संगिता तिवारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading