शिल्पा शेट्टी कुंद्राच्या “सुखी ” ट्रेलर देणारा सिनेमॅटिक अनुभव
शिल्पा शेट्टी कुंद्राच्या ” सुखी ” चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे आणि चाहते या चित्रपटासाठी आता उत्सुक झाले आहेत. प्रदीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करताना शिल्पाने अभिनेत्री म्हणून तिची अष्टपैलुत्व दाखवणारी भूमिका निवडून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना ट्रेलर ची उत्सुकता तर होतीच आणि या ट्रेलर ने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे. आकर्षक कथानकासह आणि शिल्पा शेट्टी कुंद्राचा करिश्मा पुन्हा एकदा यातून अनुभवयाला मिळणार आहे. ‘सुखी’ या आगामी चित्रपटात शिल्पा शेट्टी कुंद्रा ही मुख्य भूमिका साकारत असून ही भूमिका एक ताजेतवाने आणि विचार करायला लावणारी गोष्ट सांगणार आहे.नुकताच रिलीज झालेला ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतो ज्यामुळे ते चित्रपटाच्या आकर्षक कथे साठी अजून उत्सुक आहेत. ‘सुखी’ मध्ये, शिल्पा शेट्टी कुंद्राने अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला यांसारख्या अविश्वसनीय अभिनेत्यांसह स्क्रीन शेअर केली आहे. शिल्पा शेट्टी कुंद्राचा “सुखी” हा या वर्षातील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. सुखी एक संस्मरणीय अनुभव असणार आहे.
