सत्तेवरून चालते व्हा’ आणि देश चालवण्याची चिंता सोडून द्या…! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : भातखळकरांचे सर्वोच्च न्यायालयाप्रती असंविधानीक व बेशरम वक्तव्य भाजप मनोवृत्ती दर्शवणारे आहे काय (?) असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
‘मणिपूरमधील नग्न धिंड प्रकरणी’ सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तंबी दिल्यानंतर, भाजप आमदार अतुल भातखळकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर खेदजनक आक्षेप घेत तुम्हीच (न्यायालयानेच) सरकार चालवा(?) असे न्यायालयाप्रती निर्लज्ज वक्तव्या’वर काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रखर टिका केली.
वास्तविक राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असून सुध्दा, मणीपुर मधील हिंसाचार सरकारला नियंत्रणात आणता आला नाही, हेच भाजपचे अपयश आहे..!
महाराष्ट्रातील दंगली बाबत ‘उच्च न्यायालयाने’ शिंदे – फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले होते, खरेतर त्याचा बोध घेऊन, मणीपुर मधील कायदा सुरक्षा भाजप नेतृत्वाने सांभाळली पाहीजे होती.
मात्र कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाप्रती बेशरमपणे उर्मट वक्तव्य करणे हे भाजप संस्कृतींतच् बसते अशी पुस्ती ही त्यांनी जोडली..!
जनतेच्या सुरक्षेप्रती व कर्तव्याप्रती बेपर्वा व बेधुंद असलेल्या ‘भाजप नेतृत्वास ‘कायदा सुव्यवस्थे विषयी वा कोरोना लसीकरणा’ विषयी न्यायालयास ताशेरे ओढावे लागणे व सत्ताधिशांना राजधर्माचे पालन करण्यास सांगावे लागणे
ही बाब ‘मदर ॲाफ डेमॅाक्रसी’ म्हणवणाऱ्यांच्या देशात व ‘स्वातंत्र्याच्या अमृत काळात’ लाजीरवाणी ठरत असल्याची टिका देखील काँग्रेस ने केली.
ते पुढे म्हणाले की, भातखळकरांनी न्यायालयास काहीही सुनावणे ही त्यांची ‘संविधानिक औकात’ नाही, तर ऊलटपक्षी भातखळकरांनीच् भाजपला घेऊन सत्तेवरून पाय उतार व्हावे आणि देश चालवण्याची चिंता सोडून द्यावी.
गेल्या ७० वर्षात, स्त्री – महीला अत्याचारांचे सर्वाधिक प्रमाण भाजप राजवटीत वाढले, याचे प्रथम भाजप नेतृत्वाने आत्मचिंतन करावे व असंवैधानिक वक्तव्ये करणाऱ्या आमदार भातखळकरांचे वक्तव्या प्रती “भाजपने सर्वोच्च न्यायालयाची जाहीर माफी मागावी व लोकशाहीतील संविधानीक घटनात्मक संस्थाची बूज राखावी” असे ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे..!
