वेदांत साखरपुडा करण्यासाठी तयार होईल का?
‘३६ गुणी जोडी’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत असून मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. नुकतंच आपण पाहिलं की वेदांत व आध्या अमुल्याच्या मदतीने स्वतः नूतनसाठी शिरा बनवून वाढदिवस साजरा करतात. आरती आणि विक्रांत एकमेकांच्या प्रेमात आकंठ डुबलेले आहेत हि गोष्ट अमूल्य वेदांतला दिसून येते. दुसरीकडे अमुल्या,आद्या व सार्थक असे सगळे वेदांतला विनंती करून सांगतात की त्यांनी लग्न करायला हवं. पण वेदांत ह्यासाठी तयार नाही. इथे अमुल्या वेदांतला किमान साखरपुडा करण्यासाठी आग्रह करते. वेदांत साखरपुड्यासाठी तयार होईल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यासाठी पाहायला विसरू नका ३६ गुणी जोडी सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
