Tuesday, September 1, 2026
BusinessLatest News

अॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे ‘अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड’ सादर

मुंबई : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड हाउसपैकी एक असलेल्या अॅक्सिस म्युच्युअल फंडाने निफ्टी आयटी टीआरआय चा मागोवा घेणारा ओपन-एंडेड इंडेक्स फंड अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड या त्यांच्या नवीन फंड ऑफरची घोषणा केली. श्री हितेश दास (निधी व्यवस्थापक) फंडाचे व्यवस्थापन करतील. अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड निफ्टी आयटी टीआरआयचा मागोवा घेईल आणि निफ्टी आयटी टीआरआयच्या एकूण परताव्याशी संबंधित खर्चापूर्वी परतावा देण्याचे उद्दिष्ट ठेवेल. अर्थात हे ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन आहे. किमान गुंतवणूक रक्कम ५,००० रु. आणि त्यानंतर १ रु. च्या पटीत आहे.

इंडेक्स फंडाचे मुख्य उद्दिष्ट पोर्टफोलिओच्या दृष्टीने स्टॉक मार्केट इंडेक्सची प्रतिकृती तयार करणे आहे. या निर्देशांकातील सर्व समभागांना त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये काही प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल. मुख्य म्हणजे हे ट्रॅक केल्या जाणार्‍या निर्देशांकाच्या कामगिरी सारखेच कार्यप्रदर्शन सुनिश्चित करते. इंडेक्स फंडांतर्गत त्या विशिष्ट क्षेत्रातील वाढीच्या संधीचा लाभ घेण्याच्या उद्दिष्टासह गुंतवणुकदारांना काही विशिष्ट सेक्टर बेस्ड इंडेक्स फंडांमध्येही गुंतवणूक करण्याचाही पर्याय आहे.

भारताच्या वाढत्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील संधीचा लाभ घेत आहे
तंत्रज्ञान हा सर्व व्यवसायांसाठी, सर्व क्षेत्रांसाठी केंद्रबिंदू आहे. लहान किंवा मोठ्या सर्व संस्था, क्लाउड कॉम्प्युटिंग, मशीन लर्निंग, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादीसारख्या नवीन युगातील तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्या व्यवसायांना आकार आणि चालना देत आहेत. परिणामी हे क्षेत्र अपेक्षित मागणीपेक्षा अधिक चांगले दिसून येते. भारतीय तंत्रज्ञान कंपन्या त्यांच्या सारख्याच जागतिक कंपन्यांच्या तुलनेत त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा सातत्याने वाढवत आहेत. भारताच्या आयटी आणि बीपीएम निर्यातीने जागतिक आयटी सेवांच्या वाढीपेक्षा जास्त कामगिरी केली आहे. वार्षिक १९४ अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त निर्यातीसह, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हा भारतातील सर्वात मोठा एकल सेवा निर्यातदार उद्योग आहे.

NASSCOM नुसार उद्योगक्षेत्र २४५ अब्ज डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज असून वर्षाला १९ अब्ज डॉलरची महसुलात वाढीव भर दर्शवत आहे. आयटी सेवा, बीपीएम, सॉफ्टवेअर उत्पादने, ER&D आणि देशांतर्गत बाजारपेठ या मध्ये ही वाढ दिसून आली आहे.

२०२२ मध्ये आलेल्या बाह्य समस्यांमुळे आयटी कंपन्यांचे मूल्यांकन अधिक वाजवी झाले. कंपन्या आता सवलतीच्या दराने गेल्या ३/५ वर्षांच्या सरासरी पटीत व्यापार करत आहेत. हे आकर्षक मूल्यमापन आणि आर्थिक वर्ष २४ मधील पहिल्या तिमाही मध्ये अपेक्षेपेक्षा अधिक चांगला महसूल यामुळे आर्थिक वर्ष २४ च्या दुसऱ्या सहामाहीत महसूलामध्ये सुधारणा होऊ शकते.

अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड
अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध मापदंडाचा लाभ घेण्यासाठी अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या सध्याच्या पॅसिव्ह योजनांचा संचात जवळपास २० वेगवेगळ्या योजना आहेत. अॅक्सिस म्युच्युअल फंडने अॅक्सिस निफ्टी आयटी ईटीएफ २०२१ मध्ये सादर केला तर अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंडचे सादरीकरण एक अधिक व्यापक स्तरावर ग्राहकांसाठी गुंतवणूकीची संधी सक्षम करेल.

अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंडचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट निफ्टी आयटी टीआरआयच्या एकूण परताव्याशी संबंधित खर्चापूर्वी परतावा देण्याचे उद्दिष्ट ठेवेल. अर्थात हे ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन आहे. मात्र, योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईल, याची शाश्वती नाही. ही योजना अधोरेखित निर्देशांकाचा भाग असलेल्या समभागांमध्ये शक्य तितक्या निर्देशांकानुसार समान प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करते. मूलत: सिक्युरिटीजमध्ये केलेली ९५% ते १००% गुंतवणूक निफ्टी आयटी टीआरआय द्वारे कव्हर केली जाईल आणि उर्वरित डेब्ट आणि मनी मार्केटमधील गुंतवणूक यामध्ये होईल. तरलता आणि खर्च आवश्यकता पूर्ण करण्याच्या मर्यादेशिवाय त्या प्रमाणात एक पॅसिव्ह गुंतवणूक धोरण असणार आहे. (कृपया तपशीलवार मालमत्ता वाटप आणि गुंतवणूक धोरण आणि इतर योजना संबंधित वैशिष्ट्यांसाठी एसआयडी चा संदर्भ http://www.axismf.com वर उपलब्ध.)

फंडाच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
• कमी किमतीचे पॅसिव्ह गुंतवणूक उपाय – विशिष्ट क्षेत्रात एक्सपोजर करण्यास अनुमती देणाऱ्या कमी किंमतीच्या इक्विटी उत्पादनाच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक त्रासमुक्त उपाय
• पूर्वग्रह दूर करणे – फंड अधोरेखित निर्देशांकात गुंतवणूक करत असल्याने, सिक्युरिटीज खरेदी/विक्री करताना फंड व्यवस्थापकाचा पूर्वग्रह दूर करतो
• इक्विटी कर आकारणी – निफ्टी आयटी टीआरआय द्वारे कव्हर केलेल्या इक्विटी साधनांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाणार असल्याने, योजना इक्विटी कर आकारणीच्या अधीन आहे
• ट्रॅकिंग त्रुटीचे प्रमाण किमान राहावे यासाठी प्रयत्न- मापदंड प्रस्थापित करायचा असल्यामुळे पॅसिव्हरित्या व्यवस्थापित केलेला फंड ट्रॅकिंग त्रुटी किमान राहाव्यात यासाठी प्रयत्न करतो.

अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार म्हणाले, “भारत विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाद्वारे बदल घडवून आणण्यात अग्रेसर आहे. कोविडनंतर आम्ही आमची लवचिकता आणि पुन्हा नव्याने कामकाज करून दाखवले आहे. गेल्या तीन वर्षांत हे अधिक दिसून आले आहे. तांत्रिक नवकल्पनांच्या नेतृत्वाखाली आमची विकासगाथा पुन्हा लिहिण्याची संधी आम्हाला आहे. वाढत्या प्रमाणात सर्व कंपन्या या डिजिटल क्षेत्रात कार्यरत होतील. अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड सादर केल्यामुळे आम्ही आमच्या उत्पादनांचा विस्तार करत आहोत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या तंत्रज्ञान सक्षम कथेचा भाग होण्यासाठी आमच्या गुंतवणूकदारांना संधी देत आहोत.”

म्युच्युअल फंडाची रचना पाहता, गुंतवणूकदार एसआयपीज, एसटीपीज आणि ठराविक रकमेची गुंतवणूक यांसारख्या विविध पद्धतशीर पर्यायांमधून गुंतवणूक करू शकतात. एनएफओ सबस्क्रीप्शन २७ जून २०२३ पासून ११ जुलै २०२३ पर्यंत खुले राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading