Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

स्पायसर विद्यापीठाच्या वतीने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ब्रेमन चौकात जनजागृती

 

पुणे: जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवसाच्या निमित्ताने जनजागृती स्पायसरमधील विद्यार्थ्यांच्या वतीने ब्रेमन चौक येथे करण्यात आली
अमली पदार्थ हे शरीरासाठी घातक असून त्याचं मनुष्याच्या शरीरावर दूरगामी परिणाम दिसून येतात
अमली पदार्थांपासून परावृत्त होऊन शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त राहावं हा प्रमुख उद्देश आहे
स्पायसर विद्यापीठ कुलगुरू डॉ संजीवन अरसुड म्हणाले की माणसाच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होण्यासाठी अमली पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे
स्पायसर विद्यापीठ व विध्यार्थी समाजात जनजागृती नेहमीच अग्रेसर असून समाजोपयोगी काम करण्यासाठी आम्ही बांधील राहू असं देखील यावेळी त्यांनी आश्वासन दिलं
यावेळी ब्रेमन चौक फोरम अध्यक्ष मायकल वायदंडे यांनी स्पायसर विद्यापीठ व विद्यार्थी तसेच अमली पदार्थ जनजागृती साठी सामील झालेल्या सर्वांचं आभार मानलं
समाज सशक्त होण्यासाठी विशेषतः युवकांना ज्यास्तीत ज्यास्त समाजोपयोगी काम करण्यासाठी प्रयत्न करणार असून युवकांनी देखील त्यात सामील व्हावं असं आवाहन केलं
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त माजी नगरसेवक मनीष आनंद, स्पायसर विद्यापीठ कुलगुरू डॉ.संजीवन अरसुड,ब्रेमन चौक फोरम अध्यक्ष मायकल वायदंडे व स्पायसर विद्यापीठ मधील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading