Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

वाघोलीत No Parking तर हडपसर मध्ये P 1 – P 2 लागू होणार

पुणे : पुणे वाहतूक विभाग अंतर्गत लोणीकंद वाहतूक विभागाच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गावर वाघोलीमध्ये वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन रुग्णालय दरम्यान दोन्ही बाजूस नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे त्याचबरोबर हडपसर वाहतूक विभागाच्या हद्दीत हडपसर उड्डाणपुल ते (सह्याद्री रुग्णालय) भोसले गार्डन कमान टपाल कचेरीच्या शेजारी रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे १५० ते २०० मीटर पर्यंत पी-१ पी-२ करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ९ जुलै पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading