Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात 50 हजार शिक्षकांची होणार भरती – दीपक केसरकर

मुंबई : नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा दीपक केसरकर यांनी केली आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही असं केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर यांच्या या घोषणेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत बोलताना केसरकर यांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनाही यावेळी केसरकर यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading