स्किलेट्झ फाउंडेशनचा दुसरा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा
पुणे : स्किलेट्झ फाउंडेशन च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘मी सक्षम’ बचत गट सक्षमीकरण कार्यक्रम आणि मी सक्षम 2023 पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमच्या माध्यमाने स्किलेट्झ ने शाश्वत शहरे आणि विकासाच्या दिशेने एक सुप्त उपक्रम राबविला आहे. या कार्यक्रमात 200 हुन अधिक बचतगट प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. 250 हुन अधिक बचतगटांना नोंदणी केली असून साधारण 2800 हुन अधिक महिलांचं हे मोठं कुटुंब झाले आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिलांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे उद् घाटन सुजाता सिद्धार्थ शिरोळे, संजय कुलकर्णी आणि योगेश भामरे यांनी केले. त्यानंतर बचतगटांना माहितीपूर्ण विषरांवर मार्गदर्शन देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने खादी विकास ग्राम उद्योग तर्फे महिलांसाठी विविध उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली, बचत गटाचे कार्य आणि बचतीचे नियोजन या विषयी प्रणोती यशवंत शितोळे यांनी मार्गदर्शन दिले, कार्यक्रमाच्या पुढील भागात म्युसिक थेरपी चे सुमधूर सूर मीरा मासे यांच्याकडून महिलांनी अनुभवले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या प्रमुख अतिथी मा. श्रीमती उषा वाजपेयी यांनी महिलांना आपल्या भाषणांमधून प्रेरित केले. महिलांसाठी मनोरंजन, खेळ घेण्यात आले व बक्षीसे देण्यात आली. यापुढे मी सक्षम पुरस्कार 2023 देऊन निवडक बचत गटांना गौरविण्यात आले.
बचत गटांना ह्या कार्यक्रमातून बचत गटाची नोंदणी, बचत करायची योग्य पद्धत, सूक्ष्म कर्ज योजना व्यवसायाची सुरुवात, व्यवसायाची पाया बांधणी, आणि व्यवसाय वाढीचे सूत्रे या सगळ्या गोष्टींवर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. पुढील एक वर्षासाठी नोंदणी केलेल्या बचत गटांना मार्गदर्शन दिले जाणार आहे.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन स्किलेट्झ फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक CA सोनाली सारीपल्ली आणि संस्थापकीय संचालक डॉ. मिताली मोरे यांनी केले. ‘तू चाल पुढं’ च्या संस्थापिका वनमाला चौधरी यांनी कार्यक्रमात आपले बहुमूल्य असे योगदान दिले. स्किलेट्झ फाउंडेशन च्या अध्यक्षा ऍड. गौरी चंद्रायन, संस्थापाकीय संचालक श्रुती पाटोळे आणि ऍड. वृषाली प्रधान यांनीही ह्या कार्यक्रमाला सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती वाघमारे यांनी केले.
