Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune fire : मंतरवाडी परिसरातील गोडाऊनला भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

पुणे : आज (दि.25) पहाटे साडे तीन वाजता देवाची ऊरळी येथील मंतरवाडी परिसरात दोन गोडाऊनला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडी, लाकडी वस्तू व यंञसामुग्रीचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून तब्बल पाच तासा नंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3:27 वाजता देवाची ऊरळी, मंतरवाडी येथे दोन गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळाली होती. या गोदामांमध्ये लाकडी साहित्य, भांडी आणि यंत्रसामग्रीचा मोठा साठा होता, ज्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. आगीची माहिती कळताच पुणे केंद्रीय अग्निशमन दलाच्या सात अग्निशमन दलाच्या गाड्या, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त अग्निशमन दलासह, आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ  घटनास्थळी दाखल झाल्या व त्वरित कारवाई करण्यात आली. अखेर पाच तासानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना  यश आले आहे. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र या अग्नितांडवात गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.    

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading