Thursday, June 4, 2026
Latest NewsSports

एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघाचा विजयी चौकार; ट्रोजन्स् क्रिकेट क्लबचा दुसरा विजय !!

पुणे  : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघाने सलग चौथा विजय मिळवला. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून दुसरा विजय मिळवला.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत गौरव उपाध्याय याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ट्रोजन्स् क्रिकेट क्लबने फोनिक्स् इलेव्हनचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना फोनिक्स् इलेव्हनचा डाव गडगडला आणि ५७ धावांवर आटोपला. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबचे गोलंदाज गौरव उपाध्याय (२-६), गुरू पदूकोण (२-१६), आकाश पुरोहीत (२-११) आणि सरफराज तांबोळी (२-१९) यांनी अचूक गोलंदाजी करत झटपट डाव गुंडाळला. हे आव्हान ट्रोजन्स् क्रिकेट क्लबने ८.२ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. गौरव उपाध्याय (नाबाद २९ धावा) आणि मोहम्मद अझरूद्दीन (२१ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला सहज विजय मिळवून दिला.

प्रफुल्ल मानकर याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघाने युनायटेड इलेव्हन संघाचा ८ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयाचा चौकार नोंदविला. एचआरकॅपिटा सोल्युशन्स्ने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा धावफलकावर लावल्या. प्रफुल्ल मानकर याने ५९ धावांची खेळी केली. रोहीत ननावरे याने ३९ धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर युनायटेड इलेव्हनचा डाव १४९ धावांवर अटोपला. विजयी संघाच्या प्रफुल्ल मानकर (२-३१), स्नेहलकुमार कासार (२-२४) आणि अभिमन्यु ढमढेरे (२-३०) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
फोनिक्स् इलेव्हनः १५.१ षटकात १० गडी बाद ५७ धावा (अभय कुलकर्णी १६, गौरव उपाध्याय २-६, गुरू पदूकोण २-१६, आकाश पुरोहीत २-११, सरफराज तांबोळी २-१९) पराभूत वि. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबः ८.२ षटकात १ गडी बाद ५८ धावा (गौरव उपाध्याय नाबाद २९, मोहम्मद अझरूद्दीन २१); सामनावीरः गौरव उपाध्याय;

एचआरकॅपिटा सोल्युशन्स्ः २० षटकात ७ गडी बाद १५७ धावा (प्रफुल्ल मानकर ५९ (३८, ८ चौकार, १ षटकार), रोहीत ननावरे ३९, अरविंद चव्हाण १६, सागर पोरे २-२४, रितेश साळी २-३४) वि.वि. युनायटेड इलेव्हनः १९.४ षटकात १० गडी बाद १४९ धावा (राहूल संग्राम ३१, रितेश साळी २४, ओंकार गोखले २३, प्रफुल्ल मानकर २-३१, स्नेहलकुमार कासार २-२४, अभिमन्यु ढमढेरे २-३०); सामनावीरः प्रफुल्ल मानकर;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading