Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

जी – २० परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदर्शनास भेट देण्यासाठी पीएमपीएमएल कडून २०० बसेस

पुणे : पुणे विद्यापीठ येथे जी – २० परिषदेच्या माध्यमातुन प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन पाहण्याकरीता पुणे महानगरपालिके कडील शिक्षण मंडळ यांनी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेण्याच्या विद्यार्थ्यांना आयोजित केलेले प्रदर्शन पाहण्याकरीता महामंडळाकडे बसेसची मागणी केली आहे. त्यानुसार 22 जून पर्यंत या प्रदर्शनासाठी पीएमपीएमएल कडून 200 बसे मार्फत बससेवा पुरवण्यात येणार आहे.

त्याचे वर्गीकरण खालील प्रमाणे.

१) दिनांक २१/०६/२०२३ रोजी दुपारी १२:०० वा. प्रदर्शन स्थळी विद्यार्थ्यांना ने-आण करण्याकरीता महामंडळाकडुन ९४ बसेसचे नियोजन केले आहे.

२) दिनांक २२/०६/२०२३ रोजी दुपारी १२:०० वा. प्रदर्शन स्थळी विद्यार्थ्यांना ने-आण करण्याकरीता महामंडळाकडुन १०६ बसेसचे नियोजन करण्यात आलेले असून २ दिवसामध्ये २०० बसेस पुणे म.न.पा. शिक्षण मंडळ यांना देण्यात येणार असल्यामुळे या दोन दिवसामध्ये महामंडळाकडुन पूर्ण क्षमतेने शेड्युल मार्गावर न गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जी-२० च्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शनाला एक लाख विद्यार्थ्यांची भेट

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading