Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘वैद्यनाथ’ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड

परळी वैजनाथ : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजाताई मुंडे यांची आज सर्वानुमते बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली.

वैद्यनाथ साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली, यात सर्वच्या सर्व संचालक बिनविरोध निवडून आले होते. आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी जिल्हा उप निबंधक जाधव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात पंकजाताई मुंडे यांची पुन्हा चेअरमन पदी सर्वानुमते निवड झाली. व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड झाली.या बैठकीस संचालक सर्वश्री सतीश मुंडे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, अजय मुंडे, वाल्मिक कराड,

रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे, राजेश गिते, पांडूरंग फड,हरिभाऊ गुट्टे,सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे, केशव माळी आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल या बैठकीत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी सर्व विजयी संचालकांचेही पुष्पहार घालून स्वागत व अभिनंदन करण्यात आले. बैठकीनंतर पंकजाताई मुंडे, चंद्रकांत कराड यांचेसह सर्व संचालकांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading