Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

राजकुमार राव याला “सर्वोत्कृष्ट अभिनेता ” चा अजून एक पुरस्कार ! 

यंदा च वर्ष अभिनेता राजकुमार राव याच्यासाठी खास मानलं जातंय आणि त्याचं कारण देखील तितकच खास आहे. त्याच्या चमकदार कामगिरीसह 2023 मध्ये त्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अनेक पुरस्कारांच्या सोबतीने “
मोनिका ओ माय डार्लिंगमधील ” अभिनयासाठी बी-टाउनच्या शेपशिफ्टरने डिजिटल फिल्ममध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी) पुरस्कार जिंकला. अनेक प्रतिष्ठित अवॉर्ड ने हे वर्ष राजकुमार साठी ” पुरस्कार ” मय वर्ष झाल्याचं बघायला मिळतंय. अभिनयात कोणतीही कसर न सोडता उत्तम  कथा आणि आणखी कमालीच्या भूमिकावर हा राजकुमार काम करताना दिसतोय.
सह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि  अनुभव सिन्हा यांच्या भिडमधील त्यांच्या दमदार आणि प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
राजकुमार याने अलीकडेच जिओ स्टुडिओ इव्हेंटमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित स्त्री  2 च्या रिलीजची तारीख त्यांच्या टीमसोबत जाहीर केली. 2023 मध्ये राजकुमार राव मिस्टर आणि मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक मध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading