Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

लाखो वारकऱ्यांच्या सेवेत महा एनजीओचा सेवा रथ 

पुणे : महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेत वारकरी सेवा रथ कार्यरत आहे. सेवा रथाच्या माध्यमातून गो संवर्धन, शासकीय योजनांचा प्रचार प्रसार, वृक्ष व जल संवर्धन सेवा प्रबोधन कीर्तन, प्रवचन व भारूड केली जात आहेत. पायांची मालिश करुन देणे , कापडी बुटांचे वाटप, कचरा वेचक पिशव्या व पूर्ण वेळ मोफत रुग्णवाहिका अशा सेवा रथाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.

पू. श्री श्री रविशंकर गुरुदेव, पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, पू. श्री गुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाने  महाएनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले व त्यांचे युवा वारकरी सहकारी रथाचे संयोजन करत आहेत. महा  एनजीओ फेडरेशनचे  संस्थापक शेखर मुंदडा व चंद्रकांत राठी यांचे सहयोग सेवा रथास लाभले आहे.  फेडरेशनचे  संचालक मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, गणेश बाकले, योगेश बजाज व अनेक दानशूर यात आपली सेवा देत आहेत.
शेखर मुंदडा म्हणाले,  हजारो औषधी ट्यूबस, बिस्कीट्स, शुद्ध पेय जलच्या बॉटल्स, चुकलेल्या वारकरी वर्गाला दिंडी पर्यंत सोडणे, पायांची मालिश करुन देणे , कापडी बुटांचे वाटप, कचरा वेचक पिशव्या व पूर्ण वेळ मोफत रुग्णवाहिका अशा असंख्य सेवा हा रथ वारकरी वर्गाला उपलब्ध करुन देत आहे.
वारकऱ्यांच्या विश्वासाला पात्र असणारी व निष्ठेने सेवा करणारी संस्था म्हणून महा एनजीओ फेडरेशनने वारीमध्ये आपले  विशेष स्थान वारी दरम्यान मिळवले आहे. वारीच्या प्रत्येक क्षणाची अपडेट्स देखील महा एनजीओ फेडरेशनच्या सोशल मीडिया द्वारे भाविकांच्या पर्यंत दिली जात आहे, असेही शेखर मुंदडा यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading