Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

खराडी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सातशे घरांचा प्रकल्प पूर्ण – योगेश मुळीक यांची माहिती

पुणे : खराडी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सातशे घरांचा प्रकल्प पूर्ण झाला असून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिका धारकांना चाव्या देणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

मुळीक स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या प्रयत्नांतून चालू केलेल्या आणि त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला खराडी येथील हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, मुळीक यांनी त्याची पाहणी केली.

मुळीक म्हणाले, देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी प्रयत्नशील असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती केली जात आहे.

मुळीक म्हणाले, सर्वांसाठी घरे ही महत्त्वकांक्षी योजना सुरू केली होती. पुणे शहरातील पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचे पुणे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला होती. यामधून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात आली.

मुळीक पुढे म्हणाले, पुणे महापालिकेकडून अल्प उत्पन्न गटातील (EWS) सदनिका बांधण्यासाठी हडपसर, खराडी, वडगाव (खुर्द) या परिसरातील एकुण 8 (आठ) सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाने मंजूर केलेले होते. त्यामधून एकुण 6,264 सदनिका उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ 30 चौ.मी. पर्यंत आहे. सदर 8 प्रकल्पांचा एकुण खर्च साधारण 700 कोटी इतका होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading