Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

डी ई एस शाळेत पहिला दिवस

पुणे : शाळेचा पहिला दिवस डेक्कन एज्युकेशनच्या सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. डी ई एस पूर्व प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले आणि लोकमान्य टिळक यांची वेशभूषा केलेल्या कलावंतांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.
नवीन मराठी शाळेत प्रवेशोत्सव निमित्त फुलांच्या कमानी रंगबिरंगी लावण्या झाल्या होत्या छोट्या भीम आणि डोरेमॉन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुलेखन अक्षर पाटी देण्यात आल्या. कार्यवाहक प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर येथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली. न्यू इंग्लिश मीडियम स्कूल एन ई एम एस या शाळेत डी ई एस संस्थेच्या संस्थापकांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मा स गोळवलकर गुरुजी शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading