Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

आगीपासून वाचविण्याचे धडे घेत संस्मसरणीय ठरला शाळेचा पहिला दिवस

पुणे : आग लागली…आग लागली असे ओरडत उडालेला गोंधळ…अग्नीशमन दलाची आलेली गाडी… माॅक ड्रीलच्या माध्यमातून आग कशी विझवावी याचे विविध प्रकार अशा आगळ्यावेगळ्या वातावरणात विद्यार्थ्यांना जीवनावश्यक शिक्षण देत शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय केला. यावेळी रेवडी आणि फूल देत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे महानगरपालिकेच्या डाॅ. वसंतदादा पाटील विद्यानिकेतन हायस्कूल आणि  छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन एक या शाळेत पहिला दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला. मुलांना जीवनावश्यक कौशल्यांचे शिक्षण शाळेच्या पहिल्या दिवसापासून मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी एव्हरेस्टवीर सुविधा कडलग, मुख्याध्यापक धाकपाडे, नाईक, उपशिक्षणअधिकारी भरेकर, अग्निशामक दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सेवा मित्र मंडळाचे शिरिष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, अमर लांडे, तन्मय तोडमल, विक्रम मोहिते, अजय पंडित उपस्थित होते.
सुविधा कडलग म्हणाल्या, मुलांनी शाळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबतच खेळले देखील पाहिजे. शरीर सुदृढ ठेवण्याचे धडे देखील शाळेत दिले गेले पाहिजेत. बौद्धीक संपदा सोबत शारीरिक स्वास्थ्य देखील हवे. मुलांना खेळण्यसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading