Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८वे महाअधिवेशन ८ ऑगस्ट २०२३ रोजी तिरुपती येथे


पुणे:राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८वे महाअधिवेशन ८ ऑगस्ट २०२३ रोजी तिरुपती येथे होणार आहे. या अधिवेशनात जातनीहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रीमीलेरची मर्यादा मागील सहा वर्षा पासून वाढली नाही आहे ती वाढविण्यात यावी, ५०%आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी,आदी मागण्या मंजूर करवून घेण्या साठी व 26 मागण्यांवर या अधिवेशना मध्ये चर्चा होणार असून त्या पूर्ण करण्या समंधी ठराव पारित करून केंद्र सरकारला ते पूर्ण करण्यासाठी सादर केले जाणार आहे.
या ऐतिहासिक महा अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याकरिता राष्ट्रिय ओबीसी युवा महासंघ प्रदेश अध्यक्ष यांनी दि.१० जून ते १५ जून रोजी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, लातूर , नांदेड,परभणी आणि बीड या जिल्ह्यांचा दौरा करून सर्व समाजबांधवांना यांची माहिती देऊन महा अधिवेशनाविषयी जागृती केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading