Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रचंड खर्चाच्या जाहिराती देणारा शिंदेचा हितचिंतक कोण ? अजित पवार यांचा सवाल

मुंबई : शिवसेनेनं काल राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती छापून आणल्या होत्या, त्यावर टीका झाल्यानतंर आज पुन्हा नव्यानं जाहिराती दिल्या. पण यावरुन आता विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. इतक्या प्रचंड खर्चाच्या जाहिराती देणारा शिवसेनेचे हितचिंतक कोण ? असा सवाल त्यांनी केला आहे.

कालच्या जाहिरातीबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजे होती. आजची जाहिरात म्हणजे कालच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेनेचा जाहिरातीत उल्लेख केला आहे तर मग फक्त शिवसेनेच्या ९ मंत्र्यांची खाली माळ लावली आहे. भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत? ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे, त्यातील ५ मंत्री हे वादग्रस्त आहेत. दोन दिवसांपासून यांच्याविरोधात माध्यमातून सातत्यानं बातम्या सुरु आहेत. मग अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का?, असा सवाल पवारांनी विचारला आहे.

हे सगळं घडत असताना कालच्या जाहिरातीबाबत शिवसेनेच्या एका मंत्र्यानं सांगितलं की, त्यांच्या एका हितचिंतकानं ही जाहिरात दिली आहे. कोण हितचिंतक आहे? पहिल्या पानावर महत्वाच्या अनेक पेपरला जाहिराती दिल्या जातात. या जाहिरातीला किती खर्च येतो हे सर्वांना माहिती आहे. हा हितचिंतक कोण आहे? त्याच्याकडं कशा पद्धतीनं पैसा आला आहे? असा खडा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading