Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

Early Bird Preschool :- विद्यार्थ्यांचे औक्षण व कार्टून्स कलाकारांसोबत धम्माल करत शाळेत स्वागत

पुणे : विद्यार्थ्यांचे औक्षण करून,,सेल्फी घेत व मिकी माऊस कार्टून पात्रासोबत धम्माल मस्ती करत अर्ली बर्ड प्री स्कूल चा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत धम्माल, मस्ती करत नाच गाणी करत खाऊचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी हा दिवस साजरा केला.
धनकवडी मोहन नगर परिसरातील अर्ली बर्ड प्री स्कूल शाळेचे हे द्वितीय वर्ष असून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.तसेच, शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले.अनेक विद्यार्थ्यांनी सेल्फी घेत आनंद लुटला.पहिल्याच दिवसाचे प्रमुख आकर्षण सर्वांचा लाडका मिकी माऊस हे पात्र विद्यार्थ्यांच्या भेटीस उपस्थित झाले. त्यामुळे छोट्या मुलांनी मिकी माऊस सोबत नाच गाणे करत चॉकलेटचा आनंद घेत शाळेचा पहिला दिवस साजरा केल.
शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष राजन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या प्रियांका माळवदे- बगाडे, सहशिक्षिका  राणी थोरात,  प्रिया एडके,  स्मिता भोसले व शिपाई वर्ग यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.तसेच, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading